भाजपाची महिला शक्ती व बलाशाही भारतासाठी अग्रेसर असेल – डॉ. शुभा पाध्ये 

वसई : भाजपाची महिला शक्ती दिवसागणिक सक्षम व प्रबळ होत आहे व ही महिलाशक्तीच भारत बलाशाली कामी अग्रेसर असेल, असा दृढ विश्वास भाजप विभाग महिला मोर्चा अध्यक्ष डॉ. शुभा पाध्ये  यांनी पेल्हार डोंगरपाडा येथे भाजप विभाग, ठाणे पालघर चिटणीस फरजाना खान यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर भाजपा वरिष्ठ नेते केदारनाथ म्हात्रे, विभाग सचिव संजय पांडे, महिला मोर्चा उपाध्यक्ष निर्मला कदम, जिल्हा सरचिटणीस हरेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बसवंत, इस्तीफा खान, एव्हेन रेगो आदी मान्यवर उपस्थित होते. 
डॉ. शुभा पाध्ये आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या, “केंद्रातील मोदी सरकार व राज्यांतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीमुळे विकास कामांना मोठी गती आली आहे. त्यामुळे दिवसागणिक सर्व स्थरांतील महिलांचे भाजपाला समर्थन मिळत आहे. पक्ष फरजाना खान यांच्या पाठीमागे भक्कम उभा राहील असे सांगून त्यांनी सामाजिक राजकीय कामासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केदारनाथ म्हात्रे म्हणाले पक्ष कार्यालय जनतेसाठी नेहमी खुले असावे व हे कार्यालय दिन दलित जनतेसाठी आशास्थान व आधारस्थान बनले पाहिजे. फरजाना सारख्या जनसंपर्क असलेल्या कार्यकर्त्यां भाजपात सामील झाल्याने पक्ष संघटना मजबूत करण्यास मोठी मदत होणार असून आमचा भाग भाजपचा बालेकिल्ला बनवू असा विश्वास त्यांनी भाषणात व्यक्त केला. यावेळी हरेंद्र पाटील, रंगो, निर्मल कदम यांची समयेजीत भाषणे झाली.
कार्यक्रमांत भाजपांत प्रवेश करणाऱ्या विनय तिवारी, अनिल शर्मा, मुन्ना यादव, सोनी मॅडम, नज्म शेख, सायरा नादार आदी सामाजिक कार्यकर्त्यांचा डॉ. शुभा पाध्ये यांच्या नहस्ते सत्कार झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रफिक अन्सारी, सनी मिश्रा, विजय सरदार, सुनील यादव, जयप्रकाश पांडे, साजन यांनी खूप मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!