भाजपाचे मुंडन आंदोलन  ‛राजेंद्र लाड हटाव, महापालिका बचावचा नारा’

विरार (वार्ताहर) : भाजपा वसई विरार मनपाच्या भ्रष्ट आणि गलथान कारभार विरोधात आक्रमक झाली असून आज भाजपातर्फे वसई विरार शहर  जिल्हा अध्यक्ष सुभाष साटम यांच्या नेत्रुत्वाखाली मुंडन आंदोलन करण्यात आले.राजेंद्र लाड हटाव, महापालिका बचावचा नारा देऊन लाड यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. भ्रष्ट कार्यकारी अधिकारी राजेंद्र लाड  हटाव या मुख्य मागणीसह परिवहन सेवेचा नियोजन शून्य व भोंगळ कारभार, सुसज्ज रुग्णांलय,  बेशिस्त आणि मुजोर अनधिकृत  फेरीवाले तसेच ठेकेदारांच्या चौकशीची मागणीही  या मुंडन आंदोलन द्वारे करण्यात आली.
       वसई विरार मनपाचा भ्रष्ट  कारभार सर्वश्रुत आहे.वसई विरार मनपाच्या अधिकारी वर्गाने भ्रष्टाचाराची परिसीमा ओलांडली आहे.आयुक्तच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांत पाठीशी घालत असल्याने अधिकारी मोकाट आहेत.त्यामुळे  राजेंद्र लाड सारखे भ्रष्ट अधिकारी आयुक्तांच्या मेहरबानीमुळेच सुरक्षीत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.राजेंद्र लाड यांचा कारभारही वादग्रस्त आहे.लाड विरोधात शेकडो तक्रारी प्राप्त होऊन सुद्धा आयुक्तच पाठराखण करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत.
     महानगरपालिका स्थापन होऊन आज ८ वर्षे उलटली तरी मनपा प्रशासन करदात्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरली आहे.ठेका पद्धतीवर चाललेल्या या महापालिकेत ठेकेदारांचेच राज्य असल्याचे पहावयास मिळत आहे.परिणामी मनपा प्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता दिसून येत नसल्याचे दिसून येते.त्यामूळे ठेकेदारांच्या  चौकशीची मागणीही भाजपा ने केली आहे.
        मनपा कार्यक्षेत्रात सुसज्ज रूग्णालय नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना  खाजगी रुग्णालये लुटत आहेत.मोठा  गाजावाजा करुन लोकार्पण करणात आलेले  नालासोपारा येथील  मनपाचे  रूग्णालय वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने स्वतःच सलाईनवर आहे.त्यामूळे नागरिकांना खाजगी रूग्णालयांवर अवलंबून रहावे लागत आहे.सदर प्रकार गंभीर स्वरूपाचा असूनही मनपा प्रशासन जनतेच्या भावनांशी खेळत आहे.
        त्याखेरीज मनपाची परिवहन सेवाही रामभरोसे आल्याने तसेच नियोजनशून्य कारभारामुळे पंक्चर झाली आहे.त्यामूळे नादुरुस्त तसेच धूर ओकनाऱ्या बसेस मधून प्रवास करण्याची वेळ करदात्यांवर आली आहे.प्रशासनाने भाडेवाढ केली, परंतु प्रवाशांना  सुविधा उपलब्ध करून देण्यास मनपा असमर्थ ठरली आहे.उदघोषकाची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहून बसची वाट पहावी लागते.अशा प्रकारे मनपा प्रशासन करदात्यांच्या मजबूरीचा फायदा घेऊन जनतेची लूटमार करण्यात मग्न आहे.मनपाला प्रथमच लाभलेले सदनि दर्जाचे आयुक्त सुद्धा येथील कारभारात सुधारणा करण्यात उत्सुक नसल्याचे सद्या सूरू असलेल्या कारभारावरून स्पष्ट होते.
     यावेळी वसई विरार जिल्हा अध्यक्ष  सुभाष साटम,  जिल्हा सरचिटणीस जोगेंद्र प्रसाद चौबे, उपजिल्हाध्यक्ष दिलीप गायकवाड, जिल्हा सचिव राजेश सिंह नालासोपारा शहराध्यक्ष जितेंद्र पाटील व  इतर नागरिक यांनी स्वतः मुंडन करून  महापालिकेचा निषेध नोंदवला.  या  आंदोलनासाठी  उपस्थित  महिला विभाग  अध्यक्ष  अपर्णा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रज्ञाताई पाटील , युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजेंद्र कुमार उपस्थित होते.तसेच शहर मंडल सरचिटणीस अनिल त्रिपाठी,  शहर मंडळ उपाध्यक्ष विनायक भोसले, शहर सचिव निशिकांत शिर्के,  साऊथ इंडियन जिल्हाध्यक्ष राजेश नारायण,  महिला मोर्चा सरचिटणीस मानसी  कुरतडकर तसेच मंजिरी पंड्या,  किरण परब ,  महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रीती सुर्वे, वॉर्ड  क्रमांक २७ अध्यक्ष प्रकाश कुडतरकर,  वार्ड क्रमांक २६ योगेश कदम,  वॉर्ड क्रमांक २५ राजश्री  कासुर्डे, वार्ड क्रमांक २६ प्राजक्ता पालकर, वार्ड क्रमांक २७ सलोनी बडेकर ,वार्ड क्रमांक २८ वंदना  काडगे, वॉर्ड क्रमांक ३० नेहा महाडिक, वॉर्ड क्रमांक ३७ पुजा पालांडे तसेच भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यानी सहभाग नोंदवत मनपाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!