भाजपातर्फे आयोजित “पाणी परिषद” ही वसईतील नागरीकांची दिशाभूल आहे – समीर वर्तक

भाजपातर्फे आयोजित करण्यात येणारी “पाणी परिषद” आणि त्यासाठी घेण्यात आलेली “पत्रकार परिषद” ही वसईतील नागरीकांची दिशाभूल आहे. खासदार राजेंद्र गावित हे काही महिन्यापूर्वी कॉंग्रेसचे होते, त्यामुळे त्यांना भाजपा पदाधिकाऱ्यांची पार्श्वभूमी माहितच नसावी. भाजपच्या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक करणारे भाजपचे पदाधिकारी हे स्वतः अनेक टॅंकरचे मालक होते आणि स्वतः १९९० पासून नालासोपारा परिसरात टॅंकरद्वारे पाणी सप्लाय करत होते. आणि आज हेच टॅंकरलॉबीच्या विरोधात आवाज उठवित आहेत, म्हणजे “सौ चुहे खाके बिल्ली चली….! ” असा प्रकार आहे.
तसेच १९८९ साली टॅंकरद्वारे वसईच्या पश्चिम पट्ट्यातून होणाऱ्या अवैध पाणी उपशाविरुद्ध “हरित वसईच्या” माध्यमातून फार मोठे आंदोलन झाले होते, त्यावेळी फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि मार्कुस डाबरे ह्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण वसईत हे आंदोलन झाले होते. त्यावेळी हे संपूर्ण टॅंकर लॉबी विरारच्या माफियाच्या आशीर्वादाने चालत होती. त्यांची संपूर्ण तालुक्यात दहशत होती, त्यातच निर्मळ वाघोली परीसरातील या अवैध पाणीउपशा विरोधाच्या आंदोलकांवर पोलिसांमार्फत अमानुष लाठी चर्ज केला होता, त्यावेळी हे भाजपा पदाधिकारी कुठे होते? आजही भाजपा सातत्याने वसईतील जनतेची दिशाभूल करत आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे वसईविरार महानगरपालिकेतून गावे वगळण्याच्या “मुंबई उच्च न्यायालयातील” प्रकरणात स्वतः मुख्यमंत्र्यांनी गावे वगळू नका म्हणून प्रतिज्ञापत्र सादर केले असून मे महिन्यातील पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत स्वतः मुख्यमंत्र्यानी वसईत येऊन महानगरपालिकेतून गाव वगळण्याचे आश्वासन दिले होते. ही तर वसईकरांची फसवणूक आहे.
त्यातच एमएमआरडीएच्या माध्यमातून तर जो “प्रारूप प्रादेशिक विकास आराखडा २०१६ ते २०३६” बनवला आहे, त्यातून संपूर्ण हरित वसईलाच उध्वस्त करण्याचा डाव भाजपा सरकारने रचला आहे. या आराखड्यास *पर्यावरण संवर्धन समिती – वसई विरारच्या* माध्यमातून हरकती घेणाऱ्या ३८,००० वसईकरांना नियमात असलेली कायदेशीर सुनावणी पण ह्या एमएमआरडीएने दिली नाही. महाराष्ट्र सरकारने वसईच्या सत्ताधाऱ्यांना आणि बिल्डर लॉबीला हाताशी घेऊनच हरित वसईच्या पर्यावरणाला उध्वस्त करणारा विकास आराखडा बनवला आहे. म्हणूनच वसईकरांनो सावधान.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!