भालचंद्र बाळकृष्ण चौधरी उपाख्य भाई यांचा आ.हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी सत्कार

वसई, दि. 08 (वार्ताहर) : उमेळा येथील कार्यमहर्षी भालचंद्र चौधरी यांचा अमृत महोत्सवी सत्कार आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते झाला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर माजी आमदार डॉमनिक घोन्सालविस, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबनशेठ नाईक, माजी महापौर नारायण मानकर, महापौर रुपेश जाधव, वसई-विकास बँकेचे चेअरमन हेमंत म्हात्रे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भालचंद्र पर्व या पुस्तकाचं प्रकाशन झालं.
भालचंद्र चौधरी यांना आदराने आपण भाई असे म्हणतो. समाजासाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचलं. निःस्वार्थपणे त्यांनी समाजासाठी मोठं योगदान दिलं आहे. उत्कृष्टता, नम्रता, शितलता, शालिनता, साहस, परिवर्तनता या गुणांनी ते आजपर्यंत ओळखले जातात. त्यांच्यासारखा समाजासाठी निःस्वार्थीपणे त्याग करणारा नेता आज होणे शक्य नाही असे गौरवोद्गार आ.हितेंद्रठाकूर यांनी यावेळी काढले व त्यांना 75 वर्ष वाढषदिवसानिमित्त दीर्घायुष्य चिंतले. बाळकृष्ण भालचंद्र चौधरी उपाख्य भाई हे तब्बल 20 वर्षे उमेळा गावचे सरपंच होते. वसई विकास बँकेचे ते संचालकदेखील होते. उमेळा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष, शाळासुधार समितीचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली व त्यांना योग्य तो न्याय दिला. त्याचबरोबर उमेळा, नायगांव परिसरातील लोकांच्या समस्यात्यांनी यावेळी जाणून घेतल्या व त्याचा तात्काळ निर्णय दिला. पाणी, रस्ते, लाईट, गटारे, उद्याने इत्यादी समस्यांचे 15 दिवसात पूर्ण होतील असं आश्‍वासन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!