भूकंपग्रस्तांसाठी उपायोजना करून दिलासा द्यावा

आमदार हितेंद्र ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

वसई : दिवाळीच्या तिसऱ्या दिवसांपासून पालघर जिल्यातील डहाणू , तलासरी तालुक्यात जाणवणाऱ्या भूकंपाच्या हादऱ्याने रहिवासी भयभीत झाले आहे. भूकंपग्रस्त नागरिकांसाठी उपाययोजना करून त्यांना सरकारने दिलासा द्यावा असे साकडे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे.आमदार क्षितिज ठाकूर , आमदार विलास तरे , माजी महापौर नारायण मानकर , रमेश कोटी यांनी भेट घेत निवेदन मुख्यामंत्र्यांना दिले.

मागील तीन महिन्यांपासून डहाणू तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या हद्दीत लहान मोठे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. नागरिकांना घर सोडून बाहेर जावे लागत आहे . भिंतींना तडे , घराची पडझड होत आहे.आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थित २० टक्क्यापर्यंत घसरली आहे. इतर शाळेत ५० टक्के इतकी झाली आहे.१ फेब्रुवारी रोजी पाच भूकंपाचे ५ धक्के बसले. ४. १ रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचा धक्का होता. नागरिक यामुळे भयभीत झाले आहेत.हळदपाडा गावातील दोन वर्षाची चिमुरडी जिवाच्या आकांताने बाहेर आली मात्र दुर्दैवाने दगडाला आदळून तिचा जागीच मृत्यू झाला गेल्या चार महिन्यापासून पालघर जिल्ह्यातील जिल्हावासीय भीतीच्या सावटाखाली आहेत डहाणू , तलासरी भागात होत असलेल्या केवळ स्थानिक समस्या समजून दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही .भूकंपग्रस्त भागापासून १८ किमी वर कुर्जे धारण , सूर्या प्रकल्पातील कवडसा , धामणी धरणे आहेत . त्याशिवाय जव्हार येथे दमणगंगा , व वैतरणा खोरे देखील आहे . पालघर जिल्ह्यात ७७ प्रकल्पाची कामे सुरु आहेत तेवढेच प्रस्तावित कामे आहेत . गौण खानिजसाठी वारंवार सुरुंग लावून स्फोट केला जातो , रिलायन्स औष्णिक विद्युत केंद्र , तारापूर अणुशक्ती केंद्रा , एमआयडीसी असे महत्वाचे प्रकल्प आहेत. भूकंपाची तीव्रता वाढली तर मोठया व देशासाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रकल्पाना धोका निर्माण होऊ शकतो . भूकंप नेमके का होतात , यातून सुटका कशी व कधी होणार या विचारात पालघर वासीय आहेत
डहाणू , तलासरी मध्ये एनडीआरएफ दाखल झाले असले तरी घरादारात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात कालवाकालव सुरु आहे भूकंप कधी येईल हे सांगता येत नाही त्यामुळे अनेकांनी घराबाहेर उतरून संसार मांडला आहे त्याचे छत गेले आहे.अनेक गाव पाड्यातील नागरिक स्थलांतरित होत आहेत.या नागरिकांना मानसिक आधाराची देखील नितांत गरज आहे.या वास्तुस्थितीचा विचार करून ,निसर्गकोप झाल्यास जीवितहानी टाळण्यासाठी व वित्तहानी कमी होण्याकरिता यंत्रणांना सतर्क राहून उपाययोजना करण्याबाबत आदेश द्यावेत असेही मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नमूद केले आहे.मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आमदार क्षितिज ठाकूर , आमदार विलास तरे , माजी महापौर नारायण मानकर , रमेश कोटी हे उपस्थित होते. याबाबात योग्य तो विचार केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!