मतदान जनजागृती करत विरार मध्ये भव्य शोभा यात्रा संपन्न

विरार (वार्ताहर) : ढोलताशाचा गजर, लेझीमचा ताल धरत विरार पुर्व मनवेलपाडा येथुन गुढी पाडव्या निमित्त निघालेल्या शोभा यात्रेत मतदान जनजागृती करण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत राऊत यांच्या पुढाकारातुन शनिवार ता. सहा रोजी विरार पुर्व मनवेलपाडा तलावा पासुन भव्य अशि शोभा यात्रा काढण्यात आली होती. या शोभा यात्रेत घोडे, रथ, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीकृती, पारंपारिक वेशभूषेत महिला, पुरुष, लहान मुले असे पाच हजाराच्या वर नागरिक सहभागी झाले होते.

‘सारे काम छोड दो, सबसे पहिले वोट दो’, ‘घर घर साक्षरता ले जायेंगे, मतदाता जागृक बनाऐंगे’, ‘देशासाठी मतदान करा, पैशावर विकु नका’, मतदार म्हणून आपली लायकी ओळखा असे फ़लक हातात घेवुन,जय दुर्गा मंडळाचे कार्यकर्त्यांनी शोभा यात्रेत मतदान जनजागृती केली आहे. या शोभायात्रेत मतदान जनजागृती सोबतच पारंपारिक वेशभूषेत,नववारी साडी घालुन, आणी डोक्यावर तुळशीपत्र घेवुन महिला, तसेच आईबाबा नगर येथील महिलांचे लेझीम पथक,विविध सामाजिक संस्था,गृहनिर्माण संस्था, चाळी मधील मुले, महिला, नागरिक महिला मंडळ, सामाजिक संदेश देत सहभागी झाल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज,त्यांचे मावळे, साई बाबा, राम यांच्या प्रतिकृती बनवुन घोडयावर आणी रथात बसविण्यात आल्या होत्या.

शनिवारी सायंकाळी सहा वाजता विरार पुर्व मनवेलपाडा येथील तलावा पासुन ही शोभायात्रा निघाली होती. मनवेलपाडा रोड, अवधुत नगर, दर्शन नगर, जळबाववाडी, मोर्या नगर करत रेल्वे स्थानक परिसरात या शोभा यात्रेचे विसर्जन करण्यात आले. या शोभायात्रेत प्रथम महिला महापौर सौ.प्रवीणा हितेन्द्र ठाकूर, महिला बालकल्याण सभापती सौ.माया चौधरी, सभापती सौ.चिरायू चौधरी, नगरसेविका संगिता भेरे,मिनल पाटील, हेमांगी पाटील, रजनी पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते भालचंद्र पाटील, सुदाम पाटील, नुतन शैक्षणीक विधालयाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, लिटल मिलेनियम स्कूल च्या प्रमुख सौ.प्रतिक्षा प्रशांत राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपला सहभाग नोंदविला होता.

या वेळी सर्वोत्कृष्ट वेशभूषा केलेल्या महिला, पुरुष यांना मा.सौ.प्रवीणा हितेन्द्र ठाकूर यांचे हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

आजच्या सोशलमिडिया आणी संगणकाच्या युगात आपल्या पारंपारिक हिंदु संस्कृतीचे दर्शन घडले पाहिजे, महापुरुषांचा इतिहास समजला पाहिजे, आणी संस्कृती टिकली पाहिजे यासाठी मागच्या पाच सहा वर्षापासुन श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळाच्या वतीने गुडीपाडव्या निमित्त दरवर्षी शोभा यात्रा काढली जाते. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत ‘लोकशाही’ बळकट करण्यासाठी मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, लोकांमध्ये मतदानाचे महत्व कळाले पाहिजे यासाठी या शोभा यात्रेत आम्ही मतदानाची जनजागृतीही केली आहे. आणी आम्ही मंडळाच्या माध्यमातुन ही जनजागृती मतदाना पर्यंत चालुच ठेवणार आहोत असे संयोजक तथा श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रशांत राऊत यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!