मदत कार्यात बहुजन विकास आघाडी सर्वत्र आघाडीवर

विरार (प्रतिनिधी) : कोरोना विरुद्धच्या लढ्यात गोरगरीब व गरजूंना विविध प्रकारची मदत पोहचविण्याच्या कामात बहुजन विकास आघाडीने आपली आघाडी पक्षाच्या वतीने कायम राखण्यात आली आहे. ब.वि.आ.पक्षाचे अध्यक्ष आम.हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम.क्षितीज ठाकूर आणि आम.राजेश पाटील, माजी महापौर राजीव पाटील, महापौर प्रवीण शेट्टी आदी ज्येष्ठ नेते आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह हे मदत कार्य यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
देशव्यापी लाॅक डाऊन परिस्थितीत अगदी सुरुवातीला अचानक समस्या निर्माण झाल्या होत्या. हातावर पोट आणि परिवार असलेल्यांना तातडीने राशन, तयार आहार पाठवणे हे काम प्राधान्याने सुरू झाले. आणि करोना बिमारी विरूद्ध लढण्याचा विश्वास, मास्क वापर, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टंन्सिंग आणि घरी थांबणं, स्वच्छता राखण्याची गरज या विषयांचे प्रबोधन सुद्धा साधण्याचा प्रयत्न या मदत कार्यात बहुजन विकास आघाडीने केला आहे.
अशा या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम.क्षितीज ठाकूर यांनी आपला एक कृती आराखडा तयार केला आहे. या लढ्यात सर्वात जास्त गरज भासेल ती रक्त पुरवठ्याची. बंदी मुळे ब्लड बँकांनी चिंता व्यक्त केली होती. अशा वेळी आम.क्षितीज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध भागात रक्तदान शिबिरांचे आयोजन झाले. हजारांहून जास्त नागरिकांनी  रक्तदान केले.
तसेच लाखभर गरजूंना, गोरगरिबांना रोजचं अन्न वितरण करण्यात आले. हे अन्नदान आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आणि रोजच्या रोज ते कार्यान्वित करणे याला जोडूनच श्रमिक व आम नागरिक गावी जायचे प्रयत्न सुरू झाले. स्थलांतर प्रक्रियेत आम.क्षितीज ठाकूर  यांच्या टीमने विशेष लक्ष दिले आहे.
औषध फवारणी कामात नवी यंत्रसामग्री आली कामाला.
सार्वजनिक स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रभावीपणे व्हावे या साठी आम.क्षितीज ठाकूर यांनी चार फवारणी व्हिईकल्स वापरात आणल्या. त्यामुळे हजारो घरे व इमारती लवकर फवारुन झाल्या. पक्षाचे पदाधिकारी पंकज ठाकूर,अजीव पाटील, काशिनाथ पाटील, नारायण मानकर, संदेश जाधव, प्रकाश राॅड्रिग्ज, भरत गुप्ता, वृंदेश पाटील, प्रकाश वनमाळी, नितीन राऊत, हेमंत म्हात्रे,किशोर नाईक, जितेंद्र शहा, प्रशांत राऊत, भरत मकवाना, प्रभाग समिती सभापती कन्हैया भोईर, निलेश देशमुख, अतुल साळुंखे, ज्येष्ठ नेते उमेश नाईक,अब्दुल हक पटेल, सगीर डांगे, कार्यकर्ते व पदाधिकारी नरेंद्र भोईर, पंकज देशमुख आदी सध्या मदत कार्यात व्यस्त आहेत.
विरार येथे जीवदानी देवी मंदिर विश्वस्त मंडळ, विवा महाविद्यालय, यंगस्टार्स ट्रस्ट, ओम साई धाम साई मंदिर विश्वस्त मंडळ, नालासोपारा येथील बहुजन विकास भवन, माणिकपूरचे समाज उन्नती मंडळ, वसईचे क्रीडा भवन अशा मातब्बर संस्थांच्या पाठबळावर आम. क्षितीज ठाकूर यांनी या परिस्थितीत आपला लढा निर्धारपूर्वक जारी ठेवला आहे.
रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने उत्तर भारतातील मजुरांची गावी जाण्याची सोय करण्यात आली. स्पेशल ट्रेन्सचा लाभ हजारोंना मिळाला आहे. वसई तालुक्यातील बऱ्याच लोकांना गुजरात, कच्छ, राजस्तान, लखनऊ, जौनपुर, झारखंड ला जायचे होते. कुणाची बसने तर अनेकांची रेल्वेने जाण्याची सोय झाली.
    सकाळ -संध्याकाळ सकस आहार वितरण
नालासोपारा पश्चिम येथील बहुजन विकास भवन येथे २५ हजार, विरार येथे ३५ हजार, नवघर माणिकपूर येथे २० आणि पूर्व पट्टीत २० हजार गोरगरीब व गरजूंना एक वेळ पुरेल इतकं  ताजे अन्न पाठवले जाते. या आधी ब.वि.आ.पक्षाच्या वतीने गहू, तांदूळ, कांदे, बटाटे आणि मसाला पाकिटे गरजूंना मदत म्हणून पाठविण्यात आली आहेत.
महापालिकेच्या क्षेत्रात प्रत्येक प्रभागात असे काम चालू असून या व्यापक कामावर आम.क्षितीज ठाकूर हे जातीने लक्ष घालून आहेत. तर महिलांमध्ये करोना बाबत जागरूकता आणि  दक्षता या बाबतीत प्रथम महिला महापौर प्रविणाताई ठाकूर, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती माया चौधरी आणि नगरसेविका पुढाकार घेऊन काम करीत आहेत.
बहुजन विकास आघाडी पक्षाच्या तिन्ही फ्रंट सध्या करोना विरुद्धच्या लढाईत आघाडीवर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!