मधुमेहासाठी जगात अव्वल ठरलेले भारतीय योग्य काळजी न घेतल्यास हृदय विकारातही अव्वल ठरू – डॉ. अंजली चामोती

वसई, दि.25 (वार्ताहर) : आपण भारतीयांनी योग्य आहार आणि नियमित व्यायामाची काळजी घेऊन जीवनशैलीत बदल केला नाही, तर मधुमेह रूग्णांच्या बाबतीत 2014 साली जगात अव्वल क्रमांकावर आलेले भारतीय 2025 साली ह्दय विकारासाठी अव्वल ठरू, अशी भिती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली असल्याचे प्रतिपादन माधवबाग आरोग्य चिकित्सा केंद्राच्या डॉ. अंजली चामोती यांनी मर्सिस,वसई (प.)येथे बोलतांना केले.

Oस्व. जॉन आल्मेडा प्रतिष्ठान आणि सुखसंपत्ती संवर्धन सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ह्दयरोग व मधुमेह विकारांवर मार्गदर्शन, तथा एकंदर आहार जागृतिसाठी खास शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी ह्दयरोग या विषयावर डॉ. चामोती बोलत होत्या. वसईचे ज्येष्ठ रूग्णमित्र तथा सामाजिक कार्यकर्ते फ्रॅंक मिरांडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरास आहार तज्ञ डॉ. डिऑॅन कुटिन्हो,सामाजिक कार्यकर्त्यां श्रीमती लीला परेरा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

मधुमेह, रक्तदाब , लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल या चार घटकांना नियंत्रित ठेवल्यास ह्दयविकारापासून दूर राहता येईल,मात्र त्यासाठी आहाराचे योग्य संतुलन, योगा व प्राणायमसह योग्य व्यायाम, दर सहा मह्नियानी रक्त तपासणी इ. काळजी कोणताही त्रास होण्याआधी पासूनच घेणे आवश्यक असल्याचेही डॉ. चामोती यांनी सांगितले.

हल्ली बाजारात येणारे कृत्रिमतेने वाढवलेले व पिकविलेले फळे व पालेभाज्या ओळखून व तपासून वापरायचा, बेकरी प्रॉडक्ट पासून सावध राहायचा सल्ला देवून, आहार तज्ञ डॉ. डिऑॅन कुटिन्हो यावेळी पुढे म्हणाल्या की, आठवडयातून सहा दिवस तरी दररोज अर्धा तास सायकलिंग अथवा जॉगींग केले पाहीजे.जेवनाच्या आधी व नंतर अर्धा तास अंतराने पाणी प्यावे, दिवसाला साधारण सात-आठ ग्लास आणि उन्हाळयात नऊ-दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.

माधवबाग आरोग्य चिकित्सा केंद्राच्या सहाय्यक गायत्री बिनसाळे यांनीही यावेळी उपयुक्त वैदयकिय माहिती सांगितली.

सुख संपत्ती संवर्धन संस्थेचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, मधुमेह आणि ह्दय रोगांची व्याप्ती वाढल्याने किमान आमच्या मर्सिस गावांत या विकारामुळे कोणी दगावल्याचे कानी येऊ नये, असे उद्दीष्ठे ठेवून आम्ही जनजागृती हाती घेतली आहे. दि.17एप्रिल रोजी विविध आरोग्य तपासणी व उपचाराचे मोफत शिबिर आयोजीत केले असून लवकरच ऑॅर्गेनिक फॉमिंगसाठी कृषी मार्गदर्शनाचा उपक्रमही हाती घेणार आहोत.

वसईतील रूग्णांना आरोग्य विषयक मोफत सल्ला व मार्गदर्शन करणाऱ्या ‘रूग्णमित्र’ फ्रँंक मिरांडा, जॅक गोम्स व नेल्सन लेमॉस यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. फा. ज्यो परेरा यांच्या प्रार्थनेने शिबिरास सुरुवात झाली. फा. फ्रासिंस कोरिया, ग्रामोन्नती सहकार संस्थेचे अध्यक्ष विन्सेंट अल्मेडा, जॉन अल्मेडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विन्सेंट मच्याडो, किंजल सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुनिल अनुसे इ. मान्यवर यावेळी उपस्थित होते.रोहन आल्मेडा, रॉबी ऍंड्राडीस व औब्री मेरिट आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.स्वागत व सुत्रसंचालन संदीप राऊत यांनी तर आभार प्रदर्शन स्टॅनी रॉड्रीग्ज यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!