मनसेचा बविआचे बळीराम जाधवा यांना पाठिंबाफोटो वायरल करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न

बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा प्रचार करताना मनसेचे सचिव, नगरसेवक प्रफुल पाटील, बविआचे वालीव अध्यक्ष जयप्रकाश पाटील, वालीव प्रभाग समितीचे सभापती कन्हैया भोईर, ज्येष्ठ नेते विलसन फरगोस, शशिकांत ठाकूर, युवा नेते राजा मोहिते, पुनित पाटील दिसत असून शेजारी वालीव फणसपाडा येथे सभेला जनसमुदाय छायाचित्रात दिसत आहे.

वसई (वार्ताहर) : बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पालघर लोकसभा निवडणूकीसाठी मनसेचा पाठींबा मागितला होता त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिक्षक अविनाश जाधव, पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील, कुंदन संखे, वसई-विरार शहर अध्यक्ष प्रवीण भोईर, सचिव आणि वविशमचे नगरसेवक प्रफुल पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र अग्रवाल या प्रमुख पदाधिकार्‍यांची वसई पूर्व गोखिवरे मनसे कार्यालयात बैठक झाली त्यात मनसे पदाधिकार्‍यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनाच मनसेचा पाठिंबा असेल असे जाहीर केले होते, परंतु नगरसेवक प्रफुल पाटील यांच्या कार्यालयात श्रमजीवी संघटनेचे नेते वसईचे माजी आमदार विवेकभाऊ पंडीत हे भेटीसाठी आले होते, एका मोठ्या माणसाचा सन्मान केला जातो तसाच मान सन्मान मनसेकडून केला गेला. परंतु काही उत्साही कार्यकर्त्यांनी त्याचे फोटो सोशल मिडियावर, फेस बुकवर वायरल केल्याने आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि बहुजन विकास आघाडीमध्ये संभ्रमण निर्माण झाला. परंतु मनसेकडून सध्यास्थितीत बविआचाच प्रचार केला जात असल्याचा खुलासा मनसेकडून करण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी, शाह भारत मुक्त संकल्प केला आहे. मोदी शाह मुक्त भारत करण्यासाठी आम्ही बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना पाठिंबा दिला आहे. तसा आमचा प्रचार ही जिल्ह्यात सुरु आहे. एखाद्या विरोधी पक्षाचा नेता किंवा उमेदवार आपल्या दारात आला तर त्याचा सन्मान मनसे पक्ष करतो आणि त्याबाबतचे फोटो कुणी पदाधिकारी, कार्यकर्ते सोशल मिडियावर वायरल करुन मनसे व मित्र पक्षामध्ये आणि लोकांमध्ये संभ्रमण निर्माण करण्याचा प्रयत्न यापुढे कुणी करेल अशा पदाधिकारी, कार्यकर्त्यावर पक्षातर्फे कारवाई करण्यात येईल अशी तंबीच पालघर, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांना आणि कार्यकर्त्यांना दिला असून बहुजन विकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार बळीराम जाधव यांच्या विजयासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावे असा आदेश अविनाश जाधव यांनी दिला असल्याचे प्रसिद्धी पत्रक पालघर लोकसभा जिल्हाध्यक्ष जयेंद्र पाटील, वसई विरार शहर अध्यक्ष प्रवीण भोईर, सचिव, नगरसेवक प्रफुल पाटील यांनी काढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!