मनिष वर्तक स्मृती चषक शुटींगबाॅल स्पर्धा संपन्न

महिला थ्रो बाॅल स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

वसई : रंजन क्रिडा मंडळ देवाळे आयोजीत मनिष वर्तक स्मृती चषक दिवस-रात्र शुटींगबाॅल स्पर्धा व महिला थ्रो बाॅल स्पर्धा वसईत संपन्न झाल्या.दोंन्ही स्पर्धांमध्ये मुंबई, ठाणे व पालघर येथील संघांनी सहभाग घेतला होता.या चुरशीच्या स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने वसई करांनी गर्दी केली होती.

वसईतील नावाजलेले शुटींगबाॅल पटू दिवंगत मनिष भारत वर्तक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शुटींगबाॅल व थ्रो बाॅल स्पर्धा १७ व १९ फेब्रूवारी २०१९ ला वसईत देवाळे मैदानावर भरविण्यात आल्या होत्या.१७ फेब्रूवारी रोजी खेळविण्यात आलेल्या शुटींगबाॅल स्पर्धेसाठी १६ निवडक संघांना प्रवेश देण्यात आला होता.या स्पर्धांचे उद्घाटन परिवहन सभापती प्रितेश पाटील, क्रिडापटू  विजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच पारितोषीक वितरण महाराष्ट्र शुटींगबाॅल असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर साळवी, उषा वर्तक,सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळाचे अध्यक्ष  नरेंद्र राऊत,समाज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितिन म्हात्रे आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.शुटींगबाॅल स्पर्धेत प्रथम क्रमांक बी.पी.टी.रत्नेश,द्वितीय आरभाट विक्रांत,तृतीय नवी मुंबई महानगरपालिका व चतुर्थ विजेता संघ बृहमूंबई महानगरपालिका संघ ठरला.उत्कर्ष कल्याण, सफाळा संघ,वर्तक बंधू देवाळे,लियाॅन स्पोर्टस  या संघांनी चमकदार कामगीरी करत वाहवा मिळवली.विजेत्या  प्रथम व द्वितीय संघांना रोख पारितोषीके व चषक तसेच तृतीय व उत्तेजनार्थ रोख पारितोषीके देऊन गौरविण्यात आले.उत्कृष्ट शुटर म्हणून आरमार विक्रांत संघाच्या विजय जाधव याला गौरविण्यात आले.
   त्याचप्रमाणे १९ फेब्रूवारी रोजी महिलांसाठी थ्रो बाॅल स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या.त्यात १२ संघांनी सहभाग नोंदवला.स्पर्धेचे उद्घाटन  सभापती अॅड.प्राची कोलासो व क्रिडापटू दमयंती चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.तर समारोप व बक्षीस वितरण समारंभ महिला बालकल्याण समिती सभापती माया चौधरी, समृद्धि महिला बचत गटाच्या किरण बढे व बॅसिन कॅथलिक बॅकेचे चेअरमन ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धांमध्ये प्रथम समाधान वासळई, द्वितीय पापडी स्पोर्टस, तृतीय उमेळा संघ ठरला.बोर्डी संघ,रंजन क्रिडा मंडळ,मांडलई संघ,विराट संघ,केळवे  या महिला संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.विजेत्या प्रथम व द्वितीय संघाला रोख पारितोषीक व चषक तसेच सहा संघांना रोख पारितोषीके देऊन गौरविण्यात आले.
    सदर स्पर्धांचे यशस्वी आयोजन व नियोजन रंजन क्रिडा मंडळाचे मनोजकुमार वर्तक, अजीत चौधरी,विपुल चौधरी,संतोष वर्तक व कार्यकर्त्यांनी यशस्वीरित्या केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!