मस्तानी नावाचा न उमगलेला दीर्घ प्रवास : भाग ३

निर्मिलेले विचार ज्यांनी, विचार त्यांचे तोकडे

मुखवटे पुसून आता, जे काजळीला जाळले

पत्र येऊन थांबले असे की, श्री आसीर्वाद उपर ……. काय बोलतो हा अर्थ चित्तात नाही. हे विचार ….. जवळून निर्माण झाले असते. ती पीडा जाईल तेव्हा पुण्यच प्राप्त होईल न होई ऐसे दिसत नाही. “राऊत लस्करामध्ये चौकीस ठेवावे इकडे राऊत येऊ लागले तो धरून एकाद्याचे पारपत्य केले म्हणजे दुसरा कोणी येणार नाही” म्हणून लिहिले एसीयास ते गोष्ट कार्याची नाही यास्तव राऊत चौकीस ठेवले नाही. लस्करातून राऊत जाईल तो बोलून येईल असे नाही यैसे असता लटका लौकिक करावा यैसे नाही. तुम्हाकडील बोभाट …… लिहिला तर तो लटके म्हणावयास आम्हाला कार्यास येईल.

आता पुण्यप्राप्तीच्या व्याख्या व गरजा बदलू लागत होत्या. राज्यकारण व अर्थकारण चित्तात आणून विचार निर्माण करण्यात येत होते. शब्दांची फिरवाफिरव व गळचेपी सहजपणे स्वीकारून बदलण्याची एक नवीन कला काहींना आत्मसाथ झालेली होती. “युक्तीच्या विचार जो विचार तो करून येणे. चालीवर नजर ठेऊन जे कर्तव्य ते करावे.” या आशयाची पत्रे जन्मदात्यांकडून पोहोचवण्यात येत होती. वाड्यातील नव्या भिंतींना कुजट, क्लेश वास येऊन भिंतींना जागोजागी कान कोरण्यात आलेले होते. पाथरवटाची छिन्नी लाजेल अशा मनाच्या खोदकामांना व घडणीस वेग आला होता. “हे विचार ….. जवळूनच निर्माण जाले असेल” असा शिक्का तयार करण्यात येऊन वेळोवेळी उमटवला जात होता. त्याच्या तिच्या चित्ताचा वेध घेण्यास वा विचार चौकटीत बसविण्यास मृगजळाचा पाठलाग सुरू होता. कल्पित कथा, दंतकथा, इतिहास कथा, सोईचे पुरावे, जनवार्ता, गोष्टी इत्यादी स्वप्नरंजनाच्या जिभेचे चोचले वेगाने पुरविले जात होते. कलेच्या, साधनेच्या, रसिकतेच्या साधनेला शरीर भोग संस्कृतीच्या पावलांखाली चिरडण्याचा आसुरी आनंद मिळवण्याचा काही सावल्यांचा यथेच्छ प्रयत्न सुरू होता. मुळात संदर्भ नसणारी पण वास्तवात असणारी खरी कलांवतीण समूह म्हणजे नृत्यकला, गानकला, पारंगत असणारी व शुद्ध साधनेत रममाण असणारा एक समूह, जो कलेचा उपयोग पोटाचा, संसाराचा चरितार्थ समतोलपणे सांभाळण्यासाठी धडपडत असणारा एक वर्ग असा होतो. या कलावंतांना राजाश्रयाने अनेकदा खरी प्रसिद्धी तर कधी वेगळीच प्रसिद्धी मिळत असे. लोकांनी रंगवलेला कलावंतीण शब्द व मुळात असणारी ती यांचा तिळमात्र संबंध नव्हता. खरी प्रतिमेची दालने व त्याचे पुरावे माहीत असतानाही अनेकदा आपलीच माणसे आपले कर्तृत्व बदनाम करण्यासाठी धडपडत असतात. तर काही आपल्या दोन ओळींच्या पत्रांना सहजपणे बाजूला सारत कल्पिताचा मुखवटा चढवत आपल्याकडेच बोट दाखवत असतात. सत्य कथेचा मागमूस लोप पडावा यासाठी काळविपर्यास, व्यक्तीविपर्यास, स्थानविपर्यास, विषयविपर्यास अशी उष्टी विधाने मनमुराद करताना तारतम्याचे भान राखण्यात बुद्धी कुंठीत झालेली होती.

सावध होत्या भिंतींच्या खुणा अन जगणारी पाखरे

लौकिक करावा बोभाट्याचा, काय कुणाचे वागणे

श्री श्रीदत्त राऊत किल्ले वसई मोहीम परिवार : ९७६४३१६६७८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!