महाआघाडीचा युतीकडून अबतक छप्पन केला जाईल – एकनाथ शिंदे

वसई (प्रतिनिधि) : पालघर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-आर.पी.आय.-रासप-श्रमजीवी संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ गुरूवारी संध्याकाळी नालासोपारा येथे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.

पालघर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा-रिपाई-श्रमजीवी संघटना महायुतीचे लोकप्रिय उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ आज नालासोपारा येथे महायुतीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित मंडळींना संबोधित करताना महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा विजय निश्चित असून जास्तीत जास्त मतांच्या फरकाने विजय मिळविण्यासाठी आपण सर्वांनी एकजूटीने पाहिजे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ५६ पक्ष एकत्र आल्याचे सांगणाऱ्या महाआघाडीचा युतीकडून अबतक छप्पन केला जाईल.असा इशारा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे बहूजन विकास आघाडीला दिला आहे.एकनाथ शिंदे यांनी बहुजन विकास आघाडी विरोधात तोफ डागली.पाण्यासाठी नगरसेवकांना पैसे द्यावे लागतात,ही शरमेची बाब आहे. बांधकाम परवान्यासाठी स्क्वेअर फुट नुसार पैसे उकळले जातात.त्यांनी महापालिकेला स्वत:ची जागीर करून ठेवली आहे. त्यांची ही गल्लीबोळातील गुंडगिरी संपवली जाईल. त्यांना जशास तसे उत्तर दिलं जाईल. शिट्टी निशाणी गेली तर त्यांचे हात पाय लटपटायला लागलेत.अशा हरणाऱ्या घोडयावर पैसे (मतं) लावू नका.असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले. तसेच कब्रस्तानचा प्रश्न सोडवण्यात आला आहे, २९ गावेही वगळण्यात येणार आहेत. आता वसई विरार मध्ये मेट्रो आणण्यात येईल,अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.या मेळाव्यामध्ये आगरी समाज शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीत सोबतच आहे, असे आगरी सेनेचे कैलास पाटील यांनी अधोरेखीत केले.

याप्रसंगी राजेंद्र गावित, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार व शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक,राज्यमंत्री मंत्री दर्जा ज्योती ठाकरे, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, लोकसभा संघटक श्रीनिवास वणगा, आर.पी.आय.पालघर जिल्हा अध्यक्ष ईश्वर धुळे, महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, आगरी सेनेचे पालघर अध्यक्ष जनार्दन पाटील, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, उपजिल्हाप्रमुख नविन दुबे,उपजिल्हाप्रमूख निलेश तेंडोलकर, दिलीप पिंपळे, तालुकाप्रमूख प्रविण म्हाप्रलकर,जितेंद्र शिंदे,राजन नाईक, सुभाष साटम , आम्रपाली साळवे, रासपचे पदाधिकारी महादेव सुतार, स्वाभिमानी वसईकर स्ंघटनेचे अध्यक्ष विजय मच्याडो आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हजारोंच्या संख्येने महायुतीचे महिला व पुरूष कार्यकर्ते हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!