महापालिका मुख्यालयातील पॅसेज मध्ये बेकायदा बांधकाम प्रकरणी महापौर, आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याच्या तक्रारी

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर महापालिका मुख्यलयात दुसराया मजल्यावरील जीना व मोकळया पॅसेज मध्ये महापौर डिंपल मेहता व आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या दालनांचे अतिक्रमण झालेले असुन या प्रकरणी महापौरांसह आयुक्त व संबंधित अधिकारायांवर एम.आर.टी.पी कायद्या खाली गुन्हा दाखल करुन जिना व पॅसेजचा मार्ग येण्या-जाण्यास सर्वासाठी मोकळा करण्याच्या तक्रारी थेट राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे शहरातील नागरिक व संघटनांनी केल्याआहेत.

मीरा-भाईंदर महापालिका मुख्यालयात लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या संगनमताने जिने, जिन्या कडे जाणारे मोकळे पॅसेज, तळ मजल्या वरील वाहनांसाठी असलेले स्टील्ट तसेच आवारातील मोकळी जागा या मध्ये बेकायदेशीर बांधकामे केली गेली आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कायद्या वर बोट ठेऊन त्यांच्या लहान सहान बांधकामांवर देखील लोकप्रतिनिधी व प्रशासन तोडक कारवाई करते. त्यांच्यावर एमआरटीपीचा गुन्हा दाखल करते. परंतु स्वत: हेच लोकप्रतिनिधी व प्रशासन मात्र सर्रास कायदे नियमांचे उल्लंघन करुन मनाला वाट्टेल तशी बांधकामे व दालने करत सुटले आहेत. त्यासाठी करोडो रुपयांचा खर्च करदात्या नागरिकांच्या पैशां मधुन केला गेला आहे. जनतेच्या पैशांची उधळपटट्टी करुन आपली आलिशान दालने बनवणाराया या लोकप्रीतनिधी व अधिकारायां विरोधात आधीच नागरिकां मध्ये संताप व्यक्त होत आहे.  त्यातच महापौर दालनाचे सव्वा दोन कोटी खर्च करुन आलिशान असे नुतनिकरण करण्याचे काम सुरु आहे. नागरिकांवर कराचा बोजा आणि शहरभर समस्या कायम असताना इकडे मात्र आलिशान दालने आणि त्याचा उपभोग घेण्याची चंगळ या लोकप्रतिनिधी, प्रशासनाने चालवली आहे. महापौर मेहतांचे आलिशान दालन बनवत असताना मागील जिन्या कडे जाणारा पॅसेज देखील बंद केला गेल्याचे उघड झाले आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावरील पॅसेज मध्ये पुढील भागात सुध्दा महापौरांचे कार्यालय वाढवण्यात आले आहे .

महापौर व आयुक्त दालनांमुळे मधला पॅसेज आणि मागील जिन्या कडे जाण्याचा मार्गच बंद केल्या प्रकरणी तक्रारी नंतर अभिप्राया साठी नगररचना विभागा कडे पाठवण्यात आले होते. नगररचना विभागाने देखील मंजुर नकाशानुसार जिने व त्या कडे जाण्याचे मार्ग, पीसेज मोकळे ठेवणेबंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. आग, आपत्कालिन स्थिती आदी प्रसंगी सुरक्षिततेच्या अनुषंगाने देखील सदर जिने, पॅसेज आदी मोकळे ठेवणो गरजेचे आहे. स्वत: आयुक्तांनी नगररचना च्या अभिप्राय नुसार कार्यवाही करण्याचा शेरा मारला आहे. परंतु नागरिकांना बेकायदा बांधकाम, पत्राशेड वा टपरी आदीचे कारण सांगुन त्यावर तोडक कारवाई करणारे आणि गुन्हे दाखल करणारे प्रशासन व लोकप्रतिनिधींनीच चालवलेल्या मुख्यालयातील बेकायदा कामा विरोधात तक्रारी सुरु झाल्या आहेत. बहुजन विकास युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश साहु, सत्यकाम फाऊंडेशनचे कृष्णा गुप्ता, आम आदमी पार्टीचे ब्रिजेश शर्मा व सुखदेव बिनबंसी, जैनम चे इरबा कोणापुरेसह अन्य काहिंनी या प्रकरणी थेट राज्यपाल, मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री सह नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी आदिंकडे महापौर डिंपल मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, कार्यकारी अभियंता दीपक खांबित, कनिष्ठ अभियंता अरविंद पाटील यांच्यावर एम.आर.टी.पी खाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

झालेले अतिक्रमण : बेकायदा बांधकाम तोडुन पॅसेज, जिने, जिन्याकडे जाणारे पॅसेज तसेच स्टील्ट मोकळे करुन नागरिकांसाठी खुले ठेवा. बेकायदा कामासाठी झालेला खर्च महापौर, आयुक्त आदिं कडुन वसुल करा अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!