महापालिकेचा निर्णय, ज्येष्ठांना मोफत प्रवास योजना लाभली

 

नालासोपारा (प्रतिनिधी) : महापालिकेच्या वतीने आपल्या परिवहन व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. जो खासकरून ज्येष्ठ नागरिक वर्गाला सुखावणारा आहे. परिवहन सेवेत या आधी ज्येष्ठ नागरिक यांना प्रवासात ५०% सवलत दिली जात होती. आम.हितेंद्र ठाकूर, आम.क्षितीज ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, प्रविणाताई ठाकूर यांच्याकडे या सुविधेची मागणी ज्येष्ठ नागरिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी मागणी केली होती.

महापालिका प्रशासनाने या संदर्भात आपली मोफत प्रवास योजना नुकतीच जाहीर केली आहे. वयाची साठी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना परिवहन बस सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेच्या विभागीय कार्यालयात या योजनेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू झाली आहे. नगरसेवकाची शिफारस आणि वयदर्शक पुरावे जोडून विहित अर्ज इच्छुकांनी विभागीय कार्यालयात सहाय्यक आयुक्त यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन महापालिकेचे नालासोपारा विभाग कार्यालयाच्या वतीने शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना केले आहे.

दरम्यान अनेक बाबतीत महापालिका अव्वल स्थान राखून आहे. आता शहरातील ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलत देणारी शिवाय मुलींनाही अशीच सवलत कायम करणारी राज्यात पहिली महापालिका होण्याचा मान आपल्या महापालिकेने मिळवला आहे. मात्र हा धाडसी निर्णय महापालिका स्थायी समिती सभापती, सभागृह आणि महापौर यांनी घेतला आहे खरा, मात्रया वाढीव खर्च आणि या योजनेचे संभाव्य लाभार्थी यांची संख्या पाहता हा शिवधनुष्य पालिका प्रशासन कसा उचलते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक व नागरिकांनी योजना आल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

वसई विरार शहर महानगर पालिकेतर्फे चालू परिवहनसेवेत आपल्या ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास करण्याची संधी आपल्या महानगरपालिकेने दिलेली आहे. त्यासाठी आपल्या विभागातील स्थानिक नगरसेवकांच्या कार्यालयात फॉर्म उपलब्ध आहेत. त्यासाठी आधारकार्ड,स्थानिक रेशनकार्ड, ६० वर्ष पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र सोबत आणून फॉर्म घेऊन भरून आवश्यक कागदपत्रासह विरार परिवहन डेपो मध्ये जमा करावा.

श्री.प्रशांत राऊत (सभापती स्थायी समिती)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!