महापालिकेची कोवीड सेंटरची झाली छळछावणी ; सर्वपक्षीय आक्रमक

वसई (वार्ताहर) : महापालिकेच्या वालीव येथील कोवीड सेंटरमध्ये रुग्णांचा जीवघेणा छळ होत असल्यामुळे सर्वपक्षीय आक्रमक झाले असून मनसेने मुख्यालयात ऱाडा करून आयुक्तांना शिव्यांची लाखोली वाहिल्याचा प्रकार घडला आहे. 

कोरोना रुग्णांच्या संपर्कात संपर्कात आलेल्या हजारो नागरिकांना उपचारासाठी महापालिकेने वालीव येथील वरून इंडस्ट्रीमधील कोरोना सेंटरमध्ये होते. या सेंटरमध्ये उपचाराच्या नावाखाली रुग्णांचा जीवघेणा छळ केला जात असल्याचे उघड झाले आहे. रुग्णांना प्यायला गरम पाण्याऐवजी टँकरचे दूषित पाणी दिले जाते, दुपारचे बारा वाजले तरी सकाळचा नाष्टा मिळत नाही, गलिच्छ आणि दुर्गंधीयुक्त शौचालयामुळे महिला रुग्णांना ओका-या येत  आहेत.
येथील एक आहे ही रुग्णांची तपासणी केली जात नाही उपचाराच्या नावाखाली त्यांना फक्त गोळ्या दिल्या जात आहेत या सेंटरमध्ये डॉक्टरही करण्यात करण्यात आलेली नाही. ड्युटीवर असलेले कर्मचारी रुग्णांची उर्मटपणे वागतात. उपचारा ऐवजी कोरोनटाईन केलेले नागरिक आजारी पडू लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या या सेंटरमधील शेकडो  नागरिकांनी आपापली घरे गाठली.हा प्रकार कळल्यावर भाजप, जनता दल आणि मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले.
भाजपाच्या महिला आघाडी प्रदेश सचिव योगिता पाटील यांनी हा प्रकार आयुक्तांच्या कानावर घालून सेंटरमधील नागरिकांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली तर जनता दलाचे निलेश वसा यांनी या सेंटर मध्ये काही दुर्घटना झाल्यास अथवा मनुष्य हानी झाल्यास आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव याप्रकरणी आपल्या कार्यकर्त्यांसह आयुक्त  गंगाथरन डी यांना भेटण्यासाठी मुख्यालयात गेले होते. मात्र फक्त दोनच कार्यकर्त्याला आपल्या दालनात पाठवण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यामुळे जाधव आक्रमक झाले.
त्यांनी कोट सेंटरमधील हेळसांड कारभाराचे फोटो आयुक्तांच्या दरवाजावर चिकटवले. त्यानंतर आयुक्तांना उद्देशून शिवीगाळ करत निषेध केला. कोवीड सेंटरमध्ये सुधारणा झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी जाधव यांनी केली. जाधव यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मुख्यालयातील वातावरण काही काळ तंग झाले होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!