महापालिकेच्या मालमत्तेत उपभोक्ता कराचा समावेश

वसई (वार्ताहर) : वसई-विरार महापालिकेने आपल्या मालमत्ता करात उपभोक्ता कर लागू करून वाढ केली आहे.ही दरवाढ पुढील वित्तीय वर्षांपासून नागरिकांना भरावी लागणार आहे.

महाराष्ट्र शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम 2016संपुर्ण राज्यात लागू केला असून,या नियमात्या तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या दैनंदिन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी निधी उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यासाठी नागरिक आणि कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांकडून उपभोक्ता कर लावण्यात येणार आहे.त्यामुळे वसई-विरार महापालिकेने घरगुती,व्यावसायिक आणि सार्वजनिक संस्था अशी वर्गवारी करून महासभेतील ठरावाद्वारे उपभोक्ता कर आकारण्याचे ठरवले आहे.

घरगुती नागरिकांना 50,बिगर घरगुतींना 500 आणि खाजगी सेवा पुरवणाऱ्य संस्थांना 150 रुपये उपभोक्ता कर आता भरावा लागणार आहे.हा कर पुढील वित्तीय वर्षापासून मालमत्ता करात सामविष्ट करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!