महायुतीची महिला आघाडी हे मधमाशीसारखे संघटन आहे.- सौ. ज्योतीताई ठाकरे

वसई (प्रतिनिधी) : शिवसेना महिला आघडी आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा वसई विरार शहर यांच्या तर्फे शिवसेना+ भाजप + रिपाई+श्रमजीवी संघटना + रासपा + आगरी सेना पालघर लोकसभेचे लाडके उमेदवार खासदार श्री राजेंद्रजी गावित साहेब यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या प्रमुख महिला कार्यकत्याची बैठक वसई रोड शिवसेना शाखा येथे दिनांक 17/04/2019 संध्या. 4 वाजता आयोजित करण्यात आली.

या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक श्रीमती ज्योतीताई ठाकरे (अध्यक्षा महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य, राज्यमंत्री दर्जा),श्रीमती दिपाली ताई मोकाशी (अध्यक्षा प्रज्वला महिला आयोग अंतर्गत,सल्लागार माथाडी कामगार संघटना महाराष्ट्र) भारती ताई गावकर (पालघर जिल्हा संपर्क संघटक), श्रीमती हेमाताई बाळशी (सरपंच अर्नाळा ग्रामपंचायत) उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमात भाजपा महिला मोर्चा मध्ये महिलांनी पक्ष प्रवेश केला तर शिवसेना भाजपाच्या महिलाच्या नियुक्त्या विविध पदांवर नियुक्ती पत्र देऊन करण्यात आल्या.

 हा कार्यक्रम श्रीमती आम्रपाली साळवे जिल्हाध्यक्षा महिला मार्चा भाजपा तसेच सौ. किरणताई चेंदवणकर जिल्हा संघटक, गटनेता,नगरसेविका शिवसेना यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आला. अर्नाळा ग्रामपंचायत श्रीमती हेमाताई बाळशी यांनी ग्रामपंचायतीला महाराष्ट्र सरकारकडून मिळालेल्या निधिमुळे जनकल्याणकारी कामे करण्यात आली, त्यामुळे पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधान म्हणून आपल्याला पहायचे असेल तर महायुतीचे उमेदवारखासदार राजेंद्र गावित यांना पालघर लोकसभेतून महिलांनी प्रचारात पुढाकार घेऊन निवडून दयावे लागेल असे उपस्थितांना आवाहन केले.

पालघर जिल्हा संपर्क संघटक भारतीताई गावकर यांनी एक स्वानुभव गोष्टी रूपाने सांगत आपण सर्वांनी मिळून खोटया राजकारण्याना सत्तेतुन बाहेर काढण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल असे प्रतिपादन केले.

श्रीमती ज्योतीताई ठाकरे यांच्या भाषणाने पूर्ण परिसराचे वातावरण नव्या उत्साहाने भरून गेले त्या आपल्या भाषणात म्हणाल्या की शिवसेना भाजप रिपाई श्रमजीवी संघटना आणि आगरी सेना ही पाच बोटे मिळून वज्रमुठ झाली आणि या वज्रमुठीपुढे कुणाची रिक्षा येऊ दे किंवा पंजा येऊ दे फुटल्या शिवाय राहणार नाही, या पालघर लोकसभेत घडणारा चमत्कार हा पुर्ण हिंदुस्थान  पाहणार आहे. आणि हा चमत्कार करणाऱ्या  या एवढया उपस्थित महिला आहेत कारण प्रत्येकीच्या मागे हजार हजार राणी माशींच बळ आहे, जेव्हा या सर्व हजार राणी माशा पेटून उठतील तेव्हा दिल्ली काही दुर नाही.

सौ. दिपाली ताई मोकाशी म्हणाल्या, गेल्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आम्ही पुर्ण पालघरच्या आणि वसई विरार च्या  गल्ली बोळात फिरलो आणि लक्षात आले की बहुजन विकास आघाडी बद्दल जनतेच्या मनात असंतोष आहे, आणि हाच असंतोष मतदारांनी पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजेंद्रजी गावीत यांना निवडून दिला आणि यावेळेसही जनता हा विश्वास युतिचे उमेदवार राजेंद्रजी गावित यांची निशाणी धनुष्य बाणा समोरिल बटण दाबुन दाखवुन देतील असा मला पुर्ण विश्वास आहे.

यावेळी शिवसेनेच्या जिल्हा समन्वयक सौ. प्राची फणसे, उपजिल्हा संघटक सौ. श्रध्दा राणे, तालुका संघटक सौ प्रभा सुर्वे, सौ. नयनाताई वर्तक, श्रीमती .अनिताताई राणे, सौ. देवयानी मेहेर, ऍजेला तांडेल, शहर संघटक श्रीमती. जसिंथा फिंच, सौ.भारतीताई खाच्चे, सौ. रेश्मा सावंत,सौ. पवित्रा चंदा, सौ. पुजा सावंत, सौ. श्रध्दा जाधव, वंदना नांदविकर,शैला हटकर, रुचिता विश्वासराव, आदि अनेक महत्वाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. उपाध्यक्षा भाजपा वसई विरार सौ. शिलाताई अय्यर,भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस सौ. हेमाताई दळवी, सरचिटणीस सौ. नितूताई सिंह, उपाध्यक्षा सौ. मंदाताई धाडवे, सचिव सौ.शलाकाताई चव्हाण, सौ प्रतिभाताई नाईक, त्याच बरोबर रिपाईच्या मार्गारेट कनथ,ईऑन योवाना, भाजपा, शिवसेना, रिपाई, श्रमजिवी रासप, आगरी सेनेच्या पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमास उपस्थित राहून तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसई रोड मंडळ पदाधिकारी श्रीकुमार मोहन, सौम्या शेट्टी, कांचन झा शिवसेनेच्या शहर संघटक सौ. जसिथा फिंच, सौ. विभा दुबे, सौ. अर्चना देवळेकर, सौ. शर्मिला कोपर्डीकर यांनी सहकार्य केले.

    हा कार्यक्रम करण्यासाठी वसई विधानसभा संघटक प्रमुख श्री. शेखर धुरी, मंडळ अध्यक्ष उत्तम कुमार, शहर प्रमुख राजाराम बाबर यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!