महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा कोकण विभागाचा दर्पण पुरस्कार विनया पंडित यांना जाहीर

वसई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा प्रतिष्ठेचा कोकण विभागासाठी चा पुरस्कार सीएनएन न्यूज १८ च्या मुंबई ब्युरो चीफ विनया देशपांडे पंडित यांना संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांनी जाहीर केला आहे. पुरस्कारांचे वितरण बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभूर्ले येथे १७ मे २०२० रोजी शानदार समारंभात होणार आहे. विनया देशपांडे पंडित या पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली १५ वर्षे कार्यरत आहेत. सध्या सीएनएन न्यूज 18 या इंग्रजी चॅनेलला मुंबई ब्युरो चीफ म्हणून काम पाहतात.

टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्र, डिजिटल, अशा सर्व क्षेत्रांत कार्य. द हिंदू, टाइम्स ऑॅफ इंडिया, संडे गारदीयन (Sunday Guardian), News X, CNN News18, All India Radio, अशा विविध ठिकाणी काम केले आहे. मागील वर्षी प्रतिष्ठित अशा  IVLP कार्यक्रमासाठी निवड झालेल्या त्या एकमेव भारतीय होय. अमेरिकी सरकारच्या या प्रोग्रॅम मध्ये सहभागी होत त्यांनी महिनाभर अमेरिकेच्या वेगवेगळया संस्थांना आणि नेत्यांना भेटी दिल्या. या प्रोग्रॅम साठी जगभरातून १७ महिलांची निवड झाली होती. त्यांना पत्रकारितेतील बरेच पुरस्कार मिळाले आहेत. Gender वरील त्यांच्या कामासाठी त्यांना २०१३  व २०१६ मधील प्रतिष्ठित लाडली पुरस्कार मिळाला. २०११ मधील त्यांच्या डिफेन्स मधील संशोधन पत्रकारितेची दखल त्यावेळचे संरक्षण मंत्री ए. के. ऍंटनी यांना घ्यावी लागली होती. देशाच्या सुरेक्षेसंदर्भातील घोटाळयात बघण्यासाठी Inquiry order करण्यात आली होती.

पत्रकारितेत येण्यापूर्वी विनया देशपांडे यांनी राज्यशास्त्र विषयात संशोधन आणि शिकवणे अशा दोन्ही गोष्टी केल्या. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे त्यांनी राज्यशास्त्र शिकवले. त्यांचे शिक्षणही तेथेच झाले, विद्यार्थीदशेत त्यांनी भारतातील पहिले विद्यार्थी community channel विद्या वाणी येथे प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम केले. १५ नोव्हेंबर रोजी रसायनी येथे जन्मलेल्या विनया देशपांडे यांचे बालपण नांदेड येथे तर कॉलेज शिक्षण-पुणे येथे झाले आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या २७ व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यपातळीवरील २६ व्या प्रतिष्ठित ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण लिमये यांच्या हस्ते पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात संपन्न झाले. त्यावेळी २७ व्या ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा रविंद्र बेडकिहाळ यांनी केली. यावेळी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूणचे कार्याध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे)चे कोकण विभागीय कार्यवाह प्रकाश देशपांडे, देवगड पंचायत समितीचे सभापती सुनील पारकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, पोंभुर्ले गावचे सरपंच सादीक डोंगरकर, जेष्ठ पत्रकार सुभाष धुमे, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर कासेकर, सुधाकर जांभेकर, शांताराम गुरव यांची उपस्थिती होती.

संस्थेतर्फे जाहीर दर्पण पुरस्कार प्राप्त पत्रकार याप्रमाणे –

ज्येष्ठ संपादक पुरस्कार – शिवाजीराव अमृतराव शिर्के (संस्थापक संपादक, साप्ताहिक पवनेचा प्रवाह, पुणे), दर्पण पुरस्कार ‘कोकण विभाग’ – संतोष कुलकर्णी (प्रतिनिधी, दैनिक सकाळ, देवगड), श्रीमती विनया देशपांडे (ब्युरो चिफ, सीएनएन न्यूज 18, मुंबई), उत्तर महाराष्ट्र विभाग-निशांत दातीर (संपादक, निशांत / संत नगर टाईम्स, अहमदनगर), पश्चिम महाराष्ट्र विभाग-गुरुबाळ माळी (प्रतिनिधी, दैनिक महाराष्ट्र टाईम्स, कोल्हापूर), मराठवाडा विभाग – दयानंज जडे (संपादक, दैनिक लातूर समाचार, लातूर), विदर्भ विभाग-अनिल जुगलकिशोरजी अग्रवाल (संपादक, दैनिक मातृभूमी व दैनिक अमरावती मंडळ, अमरावती), ज्येष्ठ पत्रकार श्री.शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत धाडसी पत्रकार ‘दर्पण’ पुरस्कार-राहुल तपासे (प्रतिनिधी, ए.बी.पी. माझा, सातारा), विशेष दर्पण पुरस्कार – सुभाष भांबुरे (प्रतिनिधी, दैनिक पुण्यनगरी, फलटण), जयपाल पाटील (संपादक, साप्ताहिक रायगडचा युवक, अलिबाग).

दर्पण पुरस्काराचे स्वरुप रोख रु.२,५००/-  व सन्मानपत्र, जांभेकर चरित्र, ग्रंथ व माहितीपट सी.डी., शाल, श्रीफळ असे आहे. या सर्व पुरस्कारांचे वितरण बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथीदिनी दिनांक १७ मे २०२० रोजी पोंभुर्ले, ता.देवगड येथील ‘दर्पण’ सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही यावेळी बेडकिहाळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!