महिलांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य करणाऱ्या समितीचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच – माधव भंडारी

विरार : विवेक संचलित राष्ट्र सेवा समितीच्या माध्यमातून मे महिन्यात वनवासी महिलांसाठी मोफत वारली चित्रकला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अगोदर शेकडोहून अधिक बांबू प्रशिक्षण घेतलेल्या महिलां मधून सदर २५ महिलांची निवड करण्यात आली होती. ५ मे ते ५ जुन या दरम्यानच्या काळात २५ महिलांना वारली चित्रकलेत प्रशिक्षित करण्यात आले. त्यापैकी २२ महिलांनी हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या प्रशिक्षणार्थी महिलांना माधव भंडारी (उपध्यक्ष-महाराष्ट्र राज्य पुरावास आणि पुनर्वसन प्राधिकरण व मुख्य प्रवक्ते-भाजप) यांच्या हस्ते ११ जुने रोजी भालिवली येथील समितीच्या प्रकल्पावर झालेल्या स्वामी विवेकानंद सभागृहातील एका कार्यक्रमात प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी राष्ट्र सेवा समितीचे सहकार्यवाह दिनेश सकपाळ, उमेश गुप्ता, व्यवस्थापक लुकेश बंड व प्रशिक्षक अंकुश अर्ज यांच्या सह शेकडो नागरिक व प्रशिक्षित महिला उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना माधव भंडारी यांनी समितीच्या सेवा कार्याची प्रशंसा केली. घरची कामे करून महिलांना रोजगार कसा मिळावा हे समितीचे मोड्यूल खूपच चांगले असून स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी मोठे आशास्थान आहे. आजवर या समितीतर्फे बांबू हस्तकला प्रशिक्षित शेकडो महिला आपला रोजगार घरची व शेतीची कामे उरकून करत असून यामध्ये अत्यंत दुर्गम भागातील्ल महिला सुद्धा आज आपल्या पायावर उभ्या झालेल्या आहेत. समिती मार्फत अगदी मोफत बांबू हस्तकला, बागायत व वारली प्रशिक्षण आदींचे प्रशिक्षण देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य करणाऱ्या समितीचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच असल्याचे भंडारी यांनी सांगितले.

जवळच्या व रोजच्या दिसणाऱ्या वस्तूंमधून रोजगार मिळवता येतो हे दाखवून देणाऱ्या समितीच्या या कामाची प्रेरणा घेउन आम्ही सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली या भागात असे प्रकल्प उभारत आहोत. सध्या या बांबू उत्पादनांमध्ये जगात चीन व व्हिएतनाम अग्रेसर आहे, त्यापध्दतीचा प्रयत्न आपल्या देशात होणे आवश्यक आहे, असे भंडारी पुढे म्हणाले.

वारली चित्रकला म्हणजे नेमके काय, किंवा केवळ एका धवल रंगात चितारलेली चित्रे म्हणजे वारली जीवनशैली व परंपरा ह्या चित्रातील शारीरिक भाषेच्या माध्यमातून प्रकट करण्याची कला असून सदर चित्रे अत्यंत बोलकी भासतात, अशी चित्रे सध्या सर्वत्र खूप प्रसिद्ध होत असून याचा ग्रामीण भागातील महिलांना फायदा व्हावा या हेतू ने हे प्रशिक्षण देण्यात आले. हा आमचा प्रयत्न आज यशस्वी होत असून अगोदर बांबू प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी वारली चित्रकला प्रशिक्षण घेऊन हस्तकलेतील बांबूंच्या वस्तू वर चितारलेल्या चित्रांमुळे सदर वस्तूंची मागणी वाढली आहे. ही उत्पादने अजून दर्जेदार झाल्याने खरेदीदार किंमतही चांगली देतीलच व वनवासी महिलांचा रोजगार मध्ये भर पडेल ही या प्रशिक्षणाची जमेची बाजू आहे, असे सौ.प्रगती भोईर (प्रशिक्षण अधिकारी) यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!