महिला विशेष लोकल पूर्ववत वसईरोड स्थानक येथूनच सोडणे

वसई (वार्ताहर) : गेली सहा वर्षे सकाळच्या वेळी वसई रोड स्थानकातून सुटणाऱ्या 9.57 च्या महिला विशेष लोकल ट्रेनमधून हजारो महिला प्रवाशी प्रवास करीत असतात. मात्र गेल्या महिन्यात पश्चिम रेल्वेकडून अचानक ही विशेष गाडी 1नोव्हेंबर 2018 पासून विरारहून सोडण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. महिला विशेष लोकल विरार येथून सुरू केल्याबद्दल आमचा कोणताही आक्षेप नाही. परंतू वसईहून सुटणारी महिला विशेष लोकल ट्रेन अचानक बंद करण्याच्या या निर्णयामुळे वसई,नायगांव परिसरातील महिला प्रवाश्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कारण या महिला विशेष लोकल ट्रेनच्या वेळेनुसार अनेक नोकरदार महिला प्रवाश्यांनी आपल्या ऑफीस व कामाच्या वेळा बदलून घेतल्या. विरारहून सुटणाऱ्या इतर लोकलमधील महिलांच्या डब्यात प्रचंड गर्दी होत असल्यामुळे वसई रोड व नायगांव स्थानकातील महिला प्रावश्यांना डब्यात चढणे शक्य होत नाही.

आनंददायी व सुखकर प्रवास हा प्रवाशांचा हक्क आहे व तो त्यांना उपलब्ध करून देणे हे रेल्वे प्रशासनाचे व लोकप्रतिनीधी तसेच शासनाचे ऊत्तरदायित्व आहे. परंतू रेल्वे प्रशासनाने वसईरोड रेल्वे स्थानकातून सकाळी 9.57 वाजता सुटणारी महिला विशेष लोकल ट्रेन अचानक बंद करून वसई व नायगांव येथील महिला प्रवाशांवर अन्याय केला आहे. या वृत्तामुळे महिलांमध्ये संताप होऊन महिला प्रवाशी प्रचंड नाराज आहेत.आज दि. 3नोव्हेंबर 2018 रोजी या विषयीचे निवेदन वसईरोड रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर यांना देण्यात आले. सदर निवेदन हे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पश्चिम रेल्वे यांना दिले जाईल. या प्रसंगी शिवसेना वसई विधानसभा संघटक मा. श्री. विनायक निकम,उप जिल्हाप्रमूख मा. श्री. विवेक पाटील,वसई तालुका प्रमूख मा. प्रविण म्हाप्रळकर,उपतालुका प्रमूख,दिलीप सुर्वे,राहूल पाटील ,सिध्देश जोगळे उपस्थित होते तसेच शिवसेना महिला आघाडीच्या पालघर जिल्हा संपर्क संघटक,सौ.भारती गांवकर,सौ.किरण चेंदवणकर पालघर जि.संघटक,सौ चित्रा किणी तालुका संघटक,सौ.प्रभा सुर्वे तालुका संघटक,सौ.रेश्मा सावंत,सौ.पवित्रा चंदा,सौ.भारती गावडे,सौ.प्रतिभा ठाकूर,सौ.श्रुतिका मयेकर,सौ.रुचिता विश्वासराव,सौ.शिल्पा वालकर,सौ.माधुरी शेट्टे,सौ.सुवर्णा चिनकटे,सौ.निषिधा घोसाळकर.सौ.प्रज्ञा जाधव,सौ.शैला हटकर,सौ.प्रियांका निकम,सौ.विणा निकम,सौ.अश्विनी निकम,सौ.निषा चौगुले या सर्व महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!