महिलेचा मृत्यू,नातवाईकांचा धिंगाणा. उपचार करणारे हॉस्पीटल आणि डॉक्टर रातोरात गायब

वसई (वार्ताहर) :  तापाने फणफणलेल्या महिलेवर उपचार करण्यास असमर्थ ठरलेले नालासोपारातील हॉस्पीटल आणि त्यातील डॉ्टरांनी रातोरात गाशा गुंडाळून पळ काढल्याची घटना घडली आहे. दरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तीचे नातलग संतप्त झाले आहेत.

नालासोपारा पुर्वेकडील अलकापुरीत राहणाऱ्या नीतु सिंह (34) यांना गेल्या बुधवारी ताप आला होता.त्यामुळे त्यांना जवळच्या दुर्गेश हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले होते.मात्र,त्यांना या हॉस्पटीलची मात्रा लागू पडली नाही.त्यामुळे सिंह यांना सुर्यदिप हॉस्पटीलमध्ये दाखल करण्यात आले,याही हॉस्पीटलची मात्रा,त्याना लागु न पडल्यामुळे 30 ऑ्टोबरला सायंकाळी 6 वाजता लाईफ केअर हॉस्पटीलमध्ये नेण्यात आले.तीथे तीन तासाच्या उपचारानंतर त्यांचे निधन झाले.त्यामुळे संबंधीत डॉ्टरांवर सिंह यांचे नातेवाईक संतप्त झाले.त्यांनी हॉस्पटीलवर हल्ला केला.

या हल्ल्याची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी घटनास्थळी जावून परिस्थिती आटो्यात आणली. डॉ्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि चुकीच्या उपचारामुळे नितूचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातलगांनी केला आहे.या प्रकरणी पोलीसांनी सिंह यांचा मृतदेह ताब्यात घेवून जे.जे.हॉस्पीटलमध्ये तपासणीसाठी पाठवला आहे.तसेच सिंह यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ्टरांचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॅनियल वेन यांनी दिली.तर या प्रकरणी माहिती गोळा केली जात आहे.त्यानंतर चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.असे महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ.राजेश चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान,नितु सिंह यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर त्यांच्यावर सर्वप्रथम अयशस्वी उपचार करणाऱ्या दुर्गेश हॉस्पीटलने रातोरात आपला गाशा गुंडाळला आहे.हॉस्पीटलच्या बोर्डसह डॉ्टर आणि कर्मचारीही गायब झाले आहेत.एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत दुर्गेश हॉस्पीटल महिनाभरापुर्वी सुरु झाले होते.एका महिन्यातच महिलेच्या उपचारास असमर्थ ठरल्यामुळे या हॉस्पीटलने रातोरात पळ काढला.जाताना येथील डॉ्टरांनी हॉस्पीटल बंद झाले असे सर्वांना सांग असा निरोप दिल्याची माहिती इमारतीच्या रखवालदाराने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!