माजी नगराध्यक्ष शकुंतला पाटील यांचे निधन

नालासोपारा : नालासोपारा नगरपरषदेत नगराध्यक्ष पद भूषविलेल्या बहुजन विकास आघाडी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या शकुंतला गजानन पाटील (वय ७०) यांचे आज सकाळी आठच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. गेली काही वर्षे त्या मधूमेह या विकाराने आजारी होत्या. आज सकाळी झोपेतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
१९९५ ला त्या नालासोपारा नगरपरिषदेवर निळेगावातून वसई विकास मंडळाच्या वतीने नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. पुढे उप-नगराध्यक्ष व २००० पासून २००५ पर्यंत त्यांनी नगराध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली होती. २००६ पासून मधूमेह हा आजार त्यांना जडला. आणि हळूहळू समाजसेवा कमी करत त्यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात नालासोपारा शहरातील पाणी पुरवठा सुधारला होता. नालासोपारा उड्डाणपूलाच्या  कामाचे भूमिपूजन त्याच्या हस्ते झाले होते तर या पूराचा उदघाटन सोहळाही त्यांच्या उपस्थितीत झाले होते. मैदाने, उद्याने, तलाव सुशोभीकरण, रस्ते रुंदीकरण, वाढीव पाणी पुरवठा आणि शहराचा शालेय कला क्रीडा महोत्सव सुरू करणे अशी काही महत्त्वाची विकास कामं त्यांनी पक्षाचे नेते आम.हितेंद्र ठाकूर, ज्येष्ठ नेते राजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली केली.
त्यांचे पती गजानन पाटील हे निळेमोरे ग्रामपंचायतीचे ३ टर्म सरपंच होते. तर प्रकाश पाटील आणि किशोर पाटील यांना नगरसेवक पदावर काम करण्याची प्रेरणा व शिकवण त्यांनी दिली, उत्तम संस्कार दिले. त्यांच्या पश्चात पती गजानन पाटील, दोन मुले व एक विवाहित कन्या आणि नातवंडे आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांचे आप्तेष्ट आणि अनेक ज्येष्ठ नेते, आजी माजी नगरसेवक, पक्ष कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी निळेगावातील त्यांच्या निवासस्थानी एकच गर्दी केली.
आम.क्षितीज ठाकूर, ज्येष्ठ नेते बबनशेठ नाईक, राजीव पाटील, पंकज ठाकूर, अजीव पाटील, शिवसेनेचे नेते शिरीष चव्हाण आदींनी पाटील कुटुबियांचे सांत्वन केले. मुंबई, नायगाव, जुचंद्र, विरार,बोरिवली, बिलालपाडा, डोंगर पाडा,नारंगी वालीव आणि शहरातील शेकडो जण त्यांच्या अंत्ययात्रेत व निळेगावातील स्मशानभूमीत अंत्यविधीत सहभागी झाले होते.
“लहान भाऊ रमाकांत घरत (बिलालपाडा) यांचे गेल्या महिन्यात झालेले निधन आणि धाकटे दीर माणिक पाटील यांच्या निकिता माणिक पाटील या तरुण मुलीचा म्रुत्यु या घटनांचा शकुंतला पाटील यांची मनस्थिती काहिशी ठीक नव्हती.” वर उड्डाणपूलाच्या संदर्भात पूलाचा उदघाटन सोहळा असे वाचावे ,तिथे “पूराचा” अशी चूक झाली आहे.
लोकनेते आम.हितेंद्र ठाकूर यांनीही निळेगावात येऊन पाटील कुटुंबाची भेट घेतली. आणि सांत्वन केले. त्यांच्या बरोबर महापालिकेतील अनेक पदाधिकारी, अधिकारी आणि ब.वि.आ.पक्षाचे वरिष्ठ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!