माझा स्कुबी – जयंत करंजवकर

मित्रा स्कुबी तू जगाचा निरोप घेतलास

तुला काय, मला काय ?
सगळ्यांना एक ना एक दिवस
जगाचा निरोप घ्यायचा आहेच…
फक्त प्रत्येकाची वेळ ठरलेली आहे
बरोबर १२ वर्षे आपण एकत्र होतो
लहानपणी काय तू तो मस्ती करायचास…
काय तुझं अंगावर लोळण,
पायाजवळ घुटमळत राहणं
जाम मस्का मारायचास रे…
पण त्यातही तो संध्याकाळचा प्रवासाचा क्षीण
हा हा म्हणता निघून जायाचा…
सकाळी तू नी मी फिरायला निघताना
रस्त्यावरील लोक तुझ्याकडे पाहून
काय फिटनेस आहे ? असे म्हणायचे
तुला आठवत असेल
मी कोणाशी बोलत राहिलो की,
तू त्या समोर बोलणा-याच्या पॅन्टवर
हळूच शुsss… करायचास
मग काय ?
तुला बरं वाटायचं पण
ते मनातल्या मनात बोलत असतील
‘काय, लेकाचा हा स्कुबी?’
राहू दे ते आता…
मॉर्निंग वॉकिंगला तुझ्यासमोर कोण डॉगी आला
तर एखाद्या ‘भाई’ सारखा अंगावर धावयचास
अगदी तुझ्या बॉस सारखा !
आता तू बोलशील, बॉस कोण ?
अर्थात तुझा अक्षू !!
जाम मजा केली आपण दोघांनी…
मग घरी येऊन तुझे एक एक
पराक्रम मम्मीला येऊन सांगयाचा मी
आणि तू ते ऐकत होतास
मम्मी दम देण्याचे नाटक करायची
तू एखाद्या आज्ञाधारक मुलासारखा बसत होतास
हो तर तुला काय सांगत होतो
असंच सकाळी फिरता फिरता
मी अचानक रस्त्यावर कोसळलो…
आणि मला काय झालं म्हणून
पहात होतास, तुझ्याकडे सहज एकाच लक्ष गेलं
तेवढ्यात मी स्वतःहून उठलो…
मग मात्र तू नेहमीप्रमाणे धावत आणि
मस्ती न
 करता घरी आणलंस…
एक-दोन दिवस बरे गेले
नंतर काय माझ्याशी नियतीने खेळ केला
हे तुला सांगायला नको…
हॉस्पिटलमध्ये होतो
पण लक्ष तू घरात एकटा बसून काय करीत असशील
हा विचार घोळत होता…
घरी आलो, डोक्याचा पूर्ण चमन  झाल्याने
ओळखशील की नाही ही मनात शंका…
घरात पाऊल टाकले
आणि तू मला ओळखलस बुवा
बरं वाटलं…
चला जगात कोणीतरी दखल घेणारा आहे म्हणून…
दहा दिवस हॉस्पिटलमध्ये होतो
पण माझे भाऊ, बहीण बघायला आले नाहीत
मरणाच्या दारातून आलो
याचा त्यांना कदाचित आवडलं नसेल
पण एक सांगू स्कुबी…
रक्ताच्या नात्या पलीकडले नाते
जवळचे वाटतात ना तेव्हा
जगण्याची हिम्मत वाढते…
त्या क्षणापासून तू आणि मीच
हेच आपलं विश्व झालं
हो की नाही !
तू जगाचा निरोप घेतलास
आता मी आणि मम्मी
तुझ्या आठवणींची उजळणी करत आहोत…
आठवणीत रमलो
पण तू नाहीस…
अधून मधून भेटायला ये स्वप्नात
मग तुला पेडिग्री देईन,
बाथरूम मध्ये घेऊन जाईन
तू मग बालदीत पाय घालून घरभर पाणी कर
मग मम्मी ओरडणार
स्कुबीsss… काय करतोस ?
या आठवणीत जगावसं वाटतं..
येशील तू माझ्या स्वप्नात ?
प्रॉमिस दे स्कुबी…
बाय स्कुबी… सी यु…

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).                     

One comment to “माझा स्कुबी – जयंत करंजवकर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!