माणसांच्या वेदना आणि आनंदाचा शोध साहित्यातून – भारत सासणे

वसई (प्रतिनिधी) : स्वप्नजीवी समाज आजाच्या धर्मयुगात भ्रमामागे लागला आहे. विश्व करूणा, सामान्य माणसाच्या वेदना आणि आनंदाच्या शोध साहित्यातूनच प्रतिबिंबित होतो. यासाठी साहित्यातून जनजागरण व्हावे, समाजात मैत्रभावना जगविण्याची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारांत, साहित्यक भारत सासणे यांनी वसई ख्रिस्ती समाजीय मराठी समित्या मंडळाच्या ११व्या साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ.सिसिलिया कार्व्हालो, आशुतोष अडोणी, डॉ.मार्तंड कुलकर्णी ह्यांच्या समवेत बॅसीन कॅथाॅलीक को-ऑॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष रायन फर्नांडिस आणि वसई-विरार महापालिकेचे महापौर प्रवीण शेट्टी विशेष अतिथी म्हणून हजर होते. मंडळाचे अध्यक्ष रेमंड मच्याडो यांनी प्रास्तविक केले.

वसई मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन वसई गिरीश येथील विरंगुळा केंद्रात संपन्न झाले. यावर्षी ११वे साहित्य संमेलन होते, या संमेलनात मोठया संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते. सभागृह खचाखच भरून लोक बाहेरही उभे होते. साहित्य-संस्कृती मंडळाचे निरीक्षक आशुतोष अडोणी आणि डॉ.मार्तंड कुलकर्णी यांची भाषणे झाली. साहित्याची गरज माणसे जोडण्यासाठी आहे. बोलीभाषेतून माणसे ओळखता येतात. आज संपर्क वाढले पण माणुसकी हरवली म्हणून साहित्यिकांनी निर्भय बनून रचना-मांडणी करावी. पुरस्कारासाठी राजकारण्यांची मिनतवारीकरू नये, असे आशुतोष अडोणी म्हणाले. तर वसईच्या लेखकांनी साहित्यातून गोडावा आणला आहे, मराठी भाषेचे संवर्धन करून मराठी भाषेला सन्मान दिला. फादर स्टीफन्स यांनी ४०० वर्षांपूर्वी पुराना लिहून एका मिशनरी धर्मगुरूंनी मराठीचा गौरव केला. मम्मी-डॅडी, गुड मॉर्निंगच्या आजच्या काळात वाचन संस्कृती हरवली आहे, म्हणून बोलीभाषेचे संवर्धन आणि साहित्यवादी विचार मांडून मराठी भाषा जतन करणे गरजेचे आहे, अरसे डॉ.मार्तंड कुलकर्णी म्हणाले.

 

”मराठी भाषेत ख्रिस्ती समाजातील मराठी साहित्याची स्थितीगती” या विषयावर कामिल पारखे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. त्यात डॉ.अनुपमा उजगरे, फ्रान्सिस वाघमारे, लेवीन भोसले, पौलीस वाघमारे, स्टीफन एम.परेरा, स्टॅन्ली गोन्साल्विस यांनी भाग घेतला.

दुपारच्या सत्रात ”पालघर जिल्ह्यातील काही प्रमुख बोली” या विषयावर परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी प्रा.प्रमिला डिसोजा होत्या. या परिसंवादात डॉ.विवेक कुडू-आगरी फ्रान्सिस डिमेलो-कादोडी/सामवेदी, दीपक माच्याडो-वाडवली, जेम्स फर्नांडीस-ईस्ट इंडियन, स्मिता पाटील वाडवली/पानवाली, जोनस वसईकर-कोळी, रमेश कांटेला-वारली अशा बोलीभाषेवर विचार मांडले.

सायंकाळी कवी रमण रमदिवे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न झाले. या संमेलनात कविता वाचन झाले, त्याला रसिकांनी जोरदार सात दिला. यात ‘मी पुन्हा येईन’ या सॅबी परेरा कवितेला रसिकांनी जोरदार साथ दिली. नियोजन आणि सर्व व्यवस्था उत्तम होती. जेवणाच्या वेळेत स्थानिक गायकांनी बँडच्या तालावर बोलीभाषेत गीते सादर करून रंगत आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: