माणिकपुर पोलीसांची कामगिरी ; मतदानात व्यस्त असतानाही ५ लाखांचे मंगळसुत्र शोधून दिले

वसई (वार्ताहर): मतदान प्रक्रियेत व्यस्त असतानाही एका महिलेची पाच लाखांचे मंगळसुत्र अवघ्या काही तासांत शोधून देण्याची कामगिरी माणिकपुर पोलीसांनी केली आहे.

पालघर मतदार संघातील संवेदनशिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसई मतदार संघात मतदानाच्या प्रक्रियेत माणिकपुर पोलीस डोळयात तेल घालून पहारा देत होते.अशावेळी १३ तोळयांचे मंगळसुत्र ठेवलेली बॅग रिक्षात विसरल्याची तक्रार जोत्स्ना बेंडयाचा या कोळी महिलेने त्यांच्याकडे केली. सकाळी वसई रेल्वे स्थानकातून त्यांनी रिक्षाद्वारे पाचुबंदर गाठले.तीथे उतरल्यानंतर काही वेळातच आपली राखाडी पर्स वजा बॅग रिक्षातच राहिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यांनी ८-१० किलोमिटर दुर असलेले माणिकपुर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली.

पोलीसांनी गांभिर्य ओळखून गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सीसीटीव्ही फुटेज बारकाईनी तपासले. त्यावेळी जोत्स्ना बसलेल्या रिक्षाचा त्यांना रजिस्ट्रेशन नंबर मिळाला. या नंबरवरून रिक्षाचालकाचा पत्ता मिळवून पोलीस त्याच्या घरी धडकले.त्यावेळी ती रिक्षा दारात उभी असल्याचे दिसून आले. आणि तीच्या सीटमागील बाजुस राखाडी रंगाची बॅग आणि बॅगेत मंगळसुत्र सापडले.त्यामुळे जोत्स्ना यांच्या जीवात जीव आला.माणिकपुर पोलीसांच्या तत्पर कर्तव्यामुळे सदर महिलेला महागडे असे सौभाग्य लेणे परत मिळाले.पोलीस निरिक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बी.एस.बांदल,पोलीस नाईक निरज शुक्ला,कपील नेमाडे, भालचंद्र बागुल, रमेश पोटे, अशोक वळवी, भारत सानप यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!