मालजीपाडयातील हातभट्टी दारुचा अड्डा उध्वस्त

वसई (वार्ताहर) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मालजीपाडयातील गावठी दारुच्या हातभट्टी उध्वस्त करून पोलीसांनी दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मालजीपाडयात गेली कित्येक वर्षांपासून गावठी दारुच्या हातभट्टया लावल्या जात आहेत.त्यावर पोलीसांकडून वारंवार कारवाई केली जात असतानाही निर्ढावलेल्या हातभट्टीवाले दारु गाळण्याचा धंदा राजरोसपणे करीत आहेत.कारवाई टाळण्यासाठी हप्तेबाजी करणे,गावाबाहेरच्या दलदलीत, पोलीस पोहचु शकणार नाही अशा जंगलात हातभट्टी लावणे अशे प्रकार त्यांच्याकडून केले जात आहे.काही वर्षांपुर्वी भाईंदरच्या खाडी बेटावरील जंगलात त्यांनी हातभट्टी लावली होती. मात्र,त्या जंगलातून सातत्याने धुर येत राहिल्यामुळे त्यांचे बिंग फुटून पोलीसांनी भट्टी उध्वस्त केली होती.

आताही या गावात हातभट्टी लावली जात असल्याचे उघडकिस आले आहे.वालीव पोलीस शिपाई निलेश सातपुते आपल्या सहकार्यांसह गस्त घालीत असताना,या गावातील पेट्रोलपंपाजवळून गावठी दारुची वाहतुक केली जात असल्याचे दिसून आले.ही 70 लिटर गावठी दारु भिवंडी येथे विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.तसेच गावठी दारु नेणाऱ्या इसमाकडून हातभट्टीचीही माहिती पोलीसांना मिळाली होती.त्यानुसार सोमवारी दुपारी धाड टाकून पोलीसांनी ही हातभट्टी उध्वस्त केली.यावेळी 1 लाख 68 हजार 500 रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला.पुंडलीक म्हात्रे नामक इसम ही हातभट्टी लावत असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली आहे.धाड टाकली जात असताना,तो पळून गेल्याचे पोलीसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!