मीडिया प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत ‘गुजरात समाचार’ च्या संघाने केला ‘महाराष्ट्र टाइम्स’ संघाचा पराभव ; सुवर्ण चषक पटकावला ! 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मीडिया प्रीमियर क्रिकेट लीग सिझन २ च्या सुवर्ण चषकासाठी झालेल्या अंतीम सामन्यात ‘गुजरात समाचार’ संघाने ‘महाराष्ट्र टाइम्स’ संघाचा दणदणीत पराभव केला आणि सुवर्ण चषक पटकावला.

मरीन लाईन्स येथील पोलिस जीमखाना मैदानावर मीडिया प्रीमियर लीग ची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत वृत्त वाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या क्रिकेट अशा ३२ संघांनी भाग घेतला होता.  तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत सुवर्ण चषकासाठी अंतीम सामन्यात धीरजभाई राठोड यांच्या नेतृत्वाखालील ‘गुजरात समाचार’ च्या संघाने प्रथम फलंदाजी घेत पाच षटकांत ९८ धावा फटकावल्या आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ संघासमोर ९९ धावांचे आव्हान ठेवले. पण या ९९ धावा करु न शकल्यामुळे धीरजभाई राठोड यांच्या नेतृत्वाखालील गुजरात समाचार च्या संघाचे नांव सुवर्ण चषकावर कोरले गेले. गुजरात समाचार च्या संघाने पाच षटकांत दोन बळी गमावून ९८ धावा फटकावल्या. महाराष्ट्र टाइम्स संघासमोर पाच षटकांत ९९ धावा करण्याचे आव्हान होते पण महाराष्ट्र टाइम्स संघाला हे आव्हान पेलवले नाही, महाराष्ट्र टाइम्स संघाला पाच षटकांत केवळ 41 धावाच करता आल्या, त्याही आठ गडी गमावून.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!