मुंबईत पार पडणार ९वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन

मुंबई (वार्ताहर) : वारकरी साहित्य परिषदेतर्फे मुंबईच्या हॉटेल नोव्हेटेल, जुहू येथे ९ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन दिनांक २१ आणि २२ डिसेंबर २०२० पार पडणार आहे.

दरम्यान पारपडणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार ंयांच्या हस्ते होणार असून या सोहळ्याला उच्च आणि तत्रशिक्षणमंत उदय सामंत, आणि माजी राज्यपाल डी.वाय.पाटील हे उपस्थित असणार आहेत. 

तर दिनांक २२ डिसेंबर रोजी सांगता सोहळा पार पडेल. या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. तर माजी मंत्री दिवाकर रावते हे स्वागताध्यक्ष असतील.

२१ डिसेंबरला सकाळी ८ वाजता दिंडी सोहळ्याने संमेलनाची सुरूवात होईल. उदघाटन सोहळ्यानंतर मावळते संमेलनाध्यक्ष ह.भ.प. श्री अमृत महाराज जोशी यांच्याकडून नवे संमेलनाध्यक्ष ह.भ.प चकोर महाराज बावीसकर हे संमेलनाची सूत्र स्विकारतील. स्वागतानंतर पहिल्या सत्रात दु.२ ते ४ या कालावधी दरम्यान संप्रदायाच्या परंपरेची जोपासना या विषयावर चर्चासत्र पार पडेल. तर सायं. ४ ते ६ दरम्यान प्रदुषण या विषयावर चर्चासत्र पार पडेल. कार्यक्रमाच्या अखेरीस ह.भ.प. डॉ. रामकृष्ण लहावितकर हे आभार प्रदर्शन करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!