मुंबई म्हाडाच्या सोडतीत राशी कांबळे पहिल्या मानकरी, २१७ घरांची सोडत जाहीर

मुंबई : मुंबईतील  म्हाडाच्या २१७ घरांच्या सोडतीचा शुभारंभ आज म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण अध्यक्ष यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर ,मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबईचे भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार,  कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील तसेच अधिकारी आणि अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते . २१७ घरांसाठी सुमारे         ६६ हजार अर्ज म्हाडाकडे प्राप्त झाले होते.
         मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचा सभापती पद स्वीकारल्या नंतर मध्यम वर्ग आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना मुंबईत घरे उपलब्ध करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशा आम्हाला सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनानेच आज सर्वसामान्यांना घरे मिळत आहेत. या घरांच्या सोडतीत पूर्णतः पारदर्शकता आहे. ज्यांना मुंबईत घरे मिळाली आहेत, त्यांनी दलालांच्या भूलथापांना बळी न पडता मुंबईतील हक्काचे घर विकण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन मधु चव्हाण यांनी सोडत विजेत्यांना केले. नायगाव बीबीडी चाळ, ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचे काम प्रगतीपथावर आहे. गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्नही मार्गी लागत असून यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन सतत मिळत असते. गोरेगाव येथील मोतीलाल नगर येथे अत्याधुनिक छोटे शहर उभे राहत आहे. हॉस्पिटल, महिलांसाठी हॉस्टेल, वृद्धाश्रम आदींची उभारणी करण्यात येणार आहे.  तेथील पदाधिका-यांशी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
       आजच्या घरांच्या सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने नागरिकांमध्ये म्हाडाविषयी विश्वास निर्माण वाढण्यास हातभार लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!