म्हाडाचे आठशे कोटी सरकार तीन महिन्यात परत करणार- मधु चव्हाण

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने नुकतीच २६ हजार कोटी रूपयांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नव्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वेची जमीन तात्काळ खरेदी करण्यासाठी सरकारने म्हाडाकडून आठशे कोटीची मागणी केली आहे. हा निधी तीन महिन्यात व्याजासह परत करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडवणीस यांनी सांगितले असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी आज पत्रकारांना दिली.
म्हाडाकडे केलेल्या निधीच्या मागणीला म्हाडातील कर्मचारी संघटनानी निधी देण्यास विरोध दर्शविला होता. म्हाडाकडे निधीच नसताना पैशांची मागणी करणे अयोग्य असल्याचे सांगत म्हाडातील या कर्मचारी संघटनानी निधी देण्यास विरोध दर्शविला. मात्र सभापती मधु चव्हाण यांनी आज त्यांच्या दालनात म्हाडा कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांना बोलावून राज्य सरकारला म्हाडाचे ८०० कोटी रुपये दिल्याने म्हाडा कर्मचा-यांच्या वेतनावर काहीच परिणाम होणार नाही असे स्पष्ट सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८०० कोटी रुपये व्याजासहित देण्याची हमी दिली असल्याचे सांगितले.कर्मचा-यांच्या वेतानासाठी  २५ कोटी रुपये  लागतात आणि म्हाडा वेतन देण्यास समर्थ आहे, असे श्री. चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले.
गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन प्रत्यनशील असून त्यासाठी रेल्वेची जमीन
मिळण्यासाठी  शासनाने म्हाडाकडून  800 कोटीचा निधी मिळण्याची मागणी केलीआहे. हा निधी तीन महिन्यात व्याजासह म्हाडाला परत मिळणार आहे. तसेच शासनाने यापूर्वी म्हाडाकडून विविध प्रकल्पांसाठी घेतलेला निधी हा गृहनिर्माण
योजनासाठीच वापरण्यात येणार आहे. तसेच म्हाडाकडे गृहनिर्माण प्रकल्पांसाठी उपलब्ध असलेला निधी लगेचच खर्च होणार नसल्यामुळे  म्हाडाची  वेगवेगळ्या बँकेत असलेली अनामत रक्कम मोडण्यात येणार असून त्यासाठी बँका तयार असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तसेच हा निधी सरकारकडून तीन महिन्यांमध्ये व्याजासह परत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी
सांगितले असल्याचेही चव्हाण यावेळी पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!