म्हाडाच्या मुंबईतील २७६ दुकानांची विक्री मार्चच्या पहिल्या आठवड्यातच – सभापती मधु चव्हाण 

मुंबई (जयंत करंजवकर) : मागील ९ वर्षांपासून म्हाडाच्य  लालफितीत अडकून पडलेल्या सुमारे २७६ दुकानांच्या विक्रीची जाहिरात मार्च महिन्याच्या  पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची महत्वाची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी आज दिली. अंधेरी पवई येथील एका दुकानाची किंमत १ कोटी ७ लाख रुपये इतकी असेल.

        लोकसभेच्या निवडणूक आचारसंहितेपुर्वी निर्णय घेतल्याने दुकानांच्या विक्रीचा आचारसंहितेचा संबंध नाही.  त्यामुळे त्याचा भंग केल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गेली नऊ वर्षे काही त्रुटींमुळे म्हाडा कार्यालयात अडकून राहिलेल्या हा प्रश्न निकालात लागल्याने मुंबई मंडळातील १९९ दुकानांची ई-टेंडरिंग जाहिरात मार्चच्या पहिल्या आठवड्यात निघतील.
        सभापती मधु चव्हाण यांनी सभापती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुंबईतील म्हाडा अंतर्गत येणा-या नायगाव, नाम जोशी मार्ग, बीपीटी येथील बीडीडी इमारतींच्या पुनर्बांधणीच्या कामांना वेग येण्यासाठी रहिवाश्याच्या परिसरात बैठका घेऊन त्यांच्या समोरच निर्णय घेतले आहेत. गोरेगाव येथील मोतीलालनगर रहिवाश्याच्या पुनर्वसनाचे काम  दोन सनदी आधिका-यांच्या वादामुळे गेली दोन वर्षे रखडले होते. त्या कामांना त्यातील प्रशासकीय अडा हानी दूर करून राहिवाश्याना कसा न्याय मिळेल त्या दृष्टीने  श्री. चव्हाण यांनी कामाना गती देऊन मोतीलाल नगरातील सुमारे तीन हजार लोकांना दिलासा दिला आहे. त्याच प्रमाणे गोरेगाव पत्राचाळचा प्रश्नही निकालात लावण्यासाठी त्यांनी मोलाचा पुढाकार घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!