म्हाडा वसाहतीतील १०० कोटींची भाडेवसुली येत्या डिसेंबर अखेर करावी – सभापती मधु चव्हाण

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई म्हाडाच्या वसाहतीतील भाडेवसुली ३४३ कोटी रुपये आहे. निदान येत्या डिसेंबर २०१८ अखेर जुन्या दराने प्रलंबित रक्कम वसूल करण्याची    अंबलबजावणी करताना १०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करावी, असे आदेश मुंबई म्हाडाचे सभापती मधु चव्हाण यांनी अधिकारी व  भाडेवसुलीकारांना दिले.
मुंबई मंडळाच्या वसाहतीतील भाडेवसुली व थकबाकी संदर्भात नुकतीच त्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली, त्यावेळी भाडे वसुलीकरणात होणारी दिरंगाई लक्षात आल्यानंतर त्यांनी एकाचवेळी ३४३ कोटी भाड्याची वसुली करता येत नसेल तर निदान १०० कोटी रुपये तरी डिसेंबर अखेर वसूल करावेत असे आदेश दिले. 
मुंबई म्हाडाच्या आधिका-यांनी सन २०१४ पासून  वार्षिक प्रशासकीय अहवाल सादरच केला नाही, याबद्दल श्री. चव्हाण यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. म्हाडा कलम १७६ (२) प्रमाणे दरवर्षी विहित कालावधीत प्राधिकारणाला व शासनाला प्रशासकीय अहवाल करणे कायदेशीर बंधनकारक आहे. परंतु संबंधित आधिका-यांनी चार वर्षांचा वार्षिक प्रशासकीय अहवाल सादर केला नसल्याबद्दल मधु चव्हाण यांनी ही बाब गंभीर व अक्षम्य असल्याचे अधिका-यांच्या  निदर्शनास आणून दिले.  संबंधित आधिका-यांनी वसाहतीतील भाडेवसुली गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. अपेक्षित वसुली किती आणि जुन्या दराप्रमाणे किती रक्कम वसूल करण्यात आली याबाबतचा अहवाल एका महिन्यात सादर करण्यात यावा आणि त्यावर पुढील बैठकीत त्याचा आढावा घेण्यात येईल, असे श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले. प्रलंबित वसुलीबाबत चर्चा करताना प्रलंबीत रकमेची वसुली  न केल्यास गाळेधारकांचा बेजबाबदारपणा वाढेल. तसेच लेखापरीक्षणामध्ये म्हाडाकडून वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न न केल्याबद्दल प्रश्न उपस्थित होतील, असे सांगून श्री. चव्हाण यांनी उपमुख्य अधिकारी यांनी जबाबदारी घेऊन मिळकत व्यवस्थापकयांच्याबरोबर वेळोवेळी चर्चा करून माहिती घ्यावी. त्याचप्रमाणे भाडेवसुलीकार यांच्याकडून ‘फिल्डबुक’ अद्यायावत करून जास्तीतजास्त प्रमाणात वसुली होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.
वसुली बाकी असलेल्या मुंबई मंडळाच्या वसाहती
■ सायन- धारावी
पोलीस विभागाकडून रक्कम वसुली प्रलंबित असून जवळपास ५० लाख रक्कम इमारत दुरुस्ती मंडळाकडून संक्रमण गाळ्याची भाडेवसुली बाकी आहे.
■ कुर्ला – चेंबूर
संबंधित विभागाचे लोकप्रतिनिधीनी कुर्ला-चेंबूर येथील काही इमारतींच्या वसुली वाढीव दराने वसुली करू नये अशी मागणी केली आहे.
■ बोरिवली
समतानगर या वसाहतीमधील सुमारे १८ ते २० कोटी 
■ महावीर नगर, कांदिवली
पाण्याच्या पाईपलाईन व पाण्याचेदेयक देण्याबाबत वाद आहेत.
■ गोरेगाव
सिध्दार्थनगर, शास्त्रीनगर येथील प्रत्येक संस्थेकडून  ७४ ते ७८ लाख रक्कम शिल्लक.
पाण्याची देयकाची २७ कोटी रक्कम शिल्लक असून प्रत्येक सोसायटीला नोटीस देण्यात आली आहे.
रकमेची वसुली  न केल्यास गाळेधारकांचा बेजबाबदारपणा वाढेल. तसेच लेखापरीक्षणामध्ये म्हाडाकडून वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न न केल्याबद्दल प्रश्न उपस्थित होतील, असे सांगून श्री. चव्हाण यांनी उपमुख्य अधिकारी यांनी जबाबदारी घेऊन मिळकत व्यवस्थापकयांच्याबरोबर वेळोवेळी चर्चा करून माहिती घ्यावी. त्याचप्रमाणे भाडेवसुलीकार यांच्याकडून ‘फिल्डबुक’ अद्यायावत करून जास्तीतजास्त प्रमाणात वसुली होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!