यशाचा मंत्र……..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत 11 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र देण्यासाठी दिल्लीत एका कार्यक्रमाचा आयोजन केला होता. अशा प्रकारे 50 विद्यार्थ्यांचा क्लास करण्याचा महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या नेत्यांनी ठरविले. पहिला मान नेहमी प्रमाणे देवाभौवी पटकावला, महागुरू जनता राजा, स्वाभिमानी दादा, सुप्रसीद व्यंगचित्रकार दादू, उद्योजी व्यासपितावर बसतात.

देवाभौ : मित्रो, (मोदी, मोदी…. सगळे घोषणा सुरू करतात…. देवाभौ त्यांना उंच हात करत थांबवण्याचे आवाहन करतात तर मित्रो… (पुन्हा एकदा, मोदींच्या घोषणात सुरु होतात) आपल्या कार्यक्रमाचे प्रेक्षेपण होत आहे तुमचं मोदीवरील प्रेम किती आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे, परीक्षेत यशस्वी व्ह्याचे असेल तर स्वत: मध्ये आत्मविश्वास पाहिजे. स्वत:च्या आई-वडिलांना विसरायचं नाही… समजले ?

विद्यार्थी : सर, मित्र पक्षाला विसरलं तर ? (सगळे विद्यार्थी खो, खो हसतात, त्यावेळी व्यासपितावर असलेले उध्दोजी दात-ओठ चावतात, परंतु मिशामुळे दिसत नाहीत.)

देवाभौ : असं वात्रटपण करू नका, त्यामुळे स्वत: मधला आत्मविश्वास कमी, कमी होतो…

विद्यार्थी : जसं तुमच्या पक्षातील नेते काहीही बरळतात , त्यामुळे तुमचा आत्मविश्वास ढळतो…

देवाभौ : राज्य सरकारने डिजिटल इंडिया करण्याचा बेत केल्याने तुमचं व्हिजन वाढत आहे, त्यामुळे आजचे विद्यार्थी स्मार्ट झाल्याने प्रश्न विचारण्याचे धाडस करतात, त्यामुळे मी माझी रजा घेतो… (जाणता राजा बोलण्यासाठी पुढे येतात…)

राजे : मी तुम्हाला यशाचा कानमंत्र सांगणार आहे…

विद्यार्थी : सांगा, सांगा… पण कान धरू नका…

राजे : माझ्या अगोदरच्या वक्तयाने आत्मविश्वासाबद्दल कळकळीने सांगितले. मी तुम्हाला आत्मविश्वासापेक्षा विश्वसाबद्दल सांगणार आहे. मी माझ्या आयुष्यात विश्वासाने सगळं करीत आलो पण माझ्यावर अविश्वास दाखवण्यात सगळयांनी धन्यता मानली. तरी मित्रांनो, मला जो अनुभव आला तो मी सांगतो की कोणावर विश्वास ठेवून परीक्षेला जाऊ नका, जे तुम्हाला पटतंय तसे उत्तर लिहा…

विद्यार्थी : हे तुम्ही कशाला सांगता, स्वत:चे ठेवावे झाकून, दुसऱ्याचे पहावे वाकून, हा तुमच्या आयुष्यातील अनुभव आम्ही झाकून ठेवणार आणि दुसऱ्याचे उत्तर वाकून पाहणार… (सभगरीहत हंशा आणि टाळयांचा कडकडाट होतो…आणि राजे त्यांच्या जागेवर गुमान बसतात)

दादा : (काटे सावरत…देवाभौकडे बघत बघत अडखळतात, तेव्हडयात दादू पुढे येऊन सावरतात, सद्या दिवस हे एकमेकांना सावरत सावरत सगळयांना झुलवयचे आहेस दादा…All The Best….असा सॉलिड डायलॉग बोलत ते जागेवर बसतात) बाळांनो…

विद्यार्थी : कोणालाबाळांनो म्हणता, शिवसेनाप्रमुखांना  ?

दादा : मी त्यांना कसे बोलू त्यांना ‘बाळांना’… त्याच्यामुळे आज येथे उभा आहे. शिक्षणाला काही अर्थ नाही, माझं कमी शिक्षण तरी बाळासाहेबांनी माझ्या अंगातून कौशलत्याला…

विद्यार्थी : जस कोकणात अंगात भूत येत तास अंगभूत बोलता का ?

दादा : तस नाही… आपल्या अंगात एक शक्ती असते ती आपल्याला ओळखत आली पाहिजे… ती सक्ती बाळासाहेबांनी ओळखली म्हणून मी राज्याच्या मोठया पदावर पोहोचलो…!

विद्यार्थी : दादा तुमची माफी मागून प्रश्न विचारू का ?

दादा : विचार, बोल बिनधास्त बोल…

विद्यार्थी : तुम्ही आतली शक्ती ओळखायला सांगता, साहेबानी तुमची ताकद काय ती ओळखली, परंतु तुमच्या मुलांमधील शक्ती तुम्हाला का ओळखतात आली नाही ?

दादा : ते कुठला रे ?

विद्यार्थी : बांद्रे, कलानगरचा…

दादा : बांद्रयाचे कोण, कोण आहेत…? ( निम्मे विद्यार्थी हात वर करतात… दादा जागेवर जाउन बसतात)

दादू : विद्यार्थ्यांनो, आपण नेहमी नवनिर्माण करण्याचे स्वप्न उशाशी …. सॉरी… उराशी बाळगले पाहिजे… मी दुपारी 12 वाजेपर्यंत झोपतो म्हणून चुकून उराशी बाळगले पाहिजे ऐवजी उशाशी बोललो… तर नवनिर्माण उभं करता करता स्वप्न  समोर ठेवले म्हणून इंजिन सहा महिन्यात राज्यभर सुसाट निघाला… आई वडिलांची सेवा करा… त्यांना कोंबडीचा सूप द्या, चुकूनही बटाटा वडा देऊ नका… (दादा आणि राजे दोघांही मनमुराद हसतात, मात्र देवाभौ राजधर्म म्हणून चेहऱ्यावर कोणतेही हावभाव आणत नाहीत… तर उद्योजी मोबाइलवर बोलण्याच्या हावभाव करीत आपण काहीच न ऐकल्यासारखे करतात…)

विद्यार्थी : (हात वर करत…) बोलू का ?

दादू : मला फालतू प्रश्न विचारायचे नाही, नाहीतर खाळकट्टयाक होईल…

विद्यार्थी : आपल्याला मनापासून सैनिक सोडून जात आहेत का ?

दादू : इंजिन मध्ये कोळसा संपला म्हणून… (हंशा….) विनोदाचा भाग सोडून द्या…गेले ते कोणाकडे ? शेवटी माझ्या विठ्ठलाकडेच ना ! मी तुम्हाला काय बोललो आता (चषमा सरळ करत आणि नाकाला हात लावत) बरं , मी काय तुम्हाला बोललो होतो, तुम्ही आई वडिलांची सेवा करा, त्यांचे स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करा… जशी मी माझ्या विठ्ठलाकडे नगरसेवक पाठविले…तसे! (विद्यार्थी जोरदार टाळया वाजवतात)

उद्योजी : माझ्या तमाम…(आपण शिवतीर्थावर नाही ही उद्योजीच्या त्यांची चूक लक्षात येत) माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांनो परीक्षांची तयारी करतांना खूप मेहनत घ्या, यश तुमच्याकडे स्वत:च्या येईल … (टाळया…) आजची मुलं मेहनती आहेत, माहिती क्षेत्रात प्रचंड प्रगती झाल्याने मूळ All rounder झालेत. आजच्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या ताकदीचा पूर्णत: अंदाज असल्याने काही पालक मुलांना शाळेत न पाठविता घरीच ज्ञानार्जन देत असतात. हा प्रयोग यशस्वी होत आहे. आपल्या पालकांना सांगू इच्छितो की, मुलांवर तुमच्या स्वत:ची स्वप्ने लाडू नका ही कळकळीची विनंती आहे.

विद्यार्थी : आपण म्हणता पालकांनी स्वत:ची स्वप्ने लादून त्याचा आयुष्य कर उध्दस्त करत आहेत…

उद्योजी : हे पहा तुमचा हा गैरसमज आहे, आमच्या घराण्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे, आई भवानी मातेचा आम्हाला कायमचा आशीर्वाद असल्याने नेतृत्व आमच्याकडे येते…

विद्यार्थी : एवढया लहान वयात युवराजांना नेतृत्व देऊन त्यांच्यावर अन्याय कारण्यासारखसी आपणास वाटत नाही…?

उद्योजी : छत्रपती शिवाजी महाराजांची वयाच्या 16व्या वर्षी हातात तलवार घेऊन तोरण किल्ला जिंकला मग बाल शिवाजीवर अन्याय केलं असं कसं म्हणत येईल ? (सगळयांना उद्योजी मुद्दा पातळ सगळे विद्यार्थी जय भवानी, जय शिवाजी असा नारा देतात) चला मित्रांनो, मला नाणार प्रकल्प बद्दल देवाभौनी एकटायला चर्चेला बोलावले आहे मी लवकर जातो अन्यथा कोणीही कोकणी नेता म्हणून घुसखोरी करेल, तरी मी आपली रजा घेतो, जय महाराष्ट्र !!

(स्टेज वरील उपस्थित नेते केव्हा गायब झाले हे कोणालाच कळले नाही)

जयंत करंजवकर
(8369696639)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: