या रिक्षांचा त्रास होतोय महायुतीला, केवढा हा धसका ?

नालासोपारा (प्रतिनिधी) :  सध्या शहरात चर्चा आहे ती महाआघाडीला या लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या ‘रिक्षा’ या चिन्हाची. त्यातच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सोपारा मुख्य रस्त्यावरील फेरीवाले हटवताना या रस्त्याला किंवा वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा नसताना रिक्षा विकणे हा व्यवसाय करणाऱ्या विवेक पाटील या व्यावसायिकाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. रितसर परवानगी घेऊन आपल्या दोन रिक्षा विकण्यासाठी ठेवलेल्या असताना त्या रिक्षा उचलण्यासाठी पालिकेचे कर्मचारी तिथे आलेच कसे? आणि कुणाच्या सांगण्यावरून ?असा संतापलेल्या विवेक पाटील यांनी केला आहे.

 अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करता पालिकेकडे तक्रार आली म्हणून आम्ही आलो असे कर्मचाऱ्यांनी पाटील यांना सांगितले. लेखी तक्रार असेल तर ती दाखवा अशी मागणी पाटील यांनी केली तेव्हा हे कर्मचारी नि:शब्द झाले. इथे सोपारा रोडवरील श्री प्रस्थ 4 थ्या रोडच्या वळणावर ही घटना घडली. या ठिकाणी महाआघाडीला पूरक व फायद्याचे ठरेल अशा प्रकारे दोन रिक्षा प्रदर्शनार्थ ठेवल्या आहेत. त्या पालिकेने उचलाव्यात अशी लगेच महाआघाडीच्या विरोधात असणाऱ्यांनी तक्रार केली आहे. पण केवळ तक्रार आहे म्हणून कोणत्याही प्रकारची चौकशी न करता ,नोटिस न देता अशी कारवाई होतेच कशी ?  असा सवाल पाटील यांनी केला आहे. तर रिक्षा बाबत धसका घेणाऱ्या युतीच्या नेत्यांनी वा कार्यकर्त्यांनी पोटदुखीतून ही तक्रार केली असावी असे पाटील यांना वाटते.

 मुख्य रस्त्याच्या कडेला भरपूर जागा सोडून ज्या दोन ‘मॉडेल’ रिक्षा ग्राहकांनी बघाव्यात म्हणून मांडण्यात आल्या आहेत त्या रिक्षा युतीच्या नेत्यांना मात्र बघवत नाहीत. असे पाटील यांनी या संदर्भात म्हटलं आहे. तर असे किती रडीचे डाव युती वाले खेळणार आहेत ?  रिक्षा व रिक्षा व्यवसाय हे काय आजचे आहे काय ? महाआघाडीचे ते निवडणूक चिन्ह त्यांना मिळाले आहे.  हा योगायोग असेल तर त्याला मी काय करु ?असा प्रतिप्रश्न पाटील यांनी या अजब कारवाई बाबत केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!