या शनिमंदीराने समीप आणले मराठी व कानडी माणसाला

नालासोपारा दि,९ (प्रतिनिधी) :  शहरात सध्या एकच चर्चा आहे. कालच शनिमहादेव मंदीर (नवे) भक्त भाविकांना विधीवत् व समारंभ पूर्वक खुले झाले. हजारो भक्त भाविकांनी गेल्या दोन तारखेपासून या मंदीर भक्तांर्पण सहभाग घेतला आहे.एकाच दिवशी 25 हजार बहुभाषी,बहुप्रांतीय शनिमहादेव,श्री नागदेव भाविक व उपासकांनी देवदर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

 या संपूर्ण कार्यक्रमात जे जे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ते पाहता मराठी व दाक्षिणात्य विशेषत: कर्नाटकी साहित्य, संगीत व नर्तन कला, भजन, लोकनाटयकला, धार्मिक भावना, उपासना व त्यातील गांभीर्य, कलेवरचे प्रेम, कौटुंबीक जिव्हाळा, सामूहिक प्रयत्न, संघभावना हे कितीतरी समान आहे. फक्त भाषा वेगळी आहे.

परवा सादर झालेले ‘गथ वैभव’ हे पौराणिक संगीत नाटक, काल सादर झालेलेश्री देवी यक्षकला निलयम् हे क्लासिक न्रित्य नाटय ही लोककला संवर्धनाची उत्तम उदाहरणं आहेत. मराठी रंगभूमीवर सादर होणारे दशावतारी मराठी पौराणिक नाटक आणि आपल्या तमाशात किंवा लोकनाटयात असलेला ऐतिहासिक वग, यात साम्य आहे. हिंदी वा भोजपुरी भाषेत सादर होणारा ‘रामलीला नाटयमहोत्सव या तिन्ही अस्सल लोककला सादरीकरणात अभिनय करणारी मंडळी, संगीत साथ देणारी वादक मंडळी, कोरस, हे सारे एकाच वेळी रंगभूमीवर असतात. या नाटकांत काम करणारे कलावंत अष्टपैलू असतात. ते गायन,मुद्राभिनय, नर्तन, वाद्यवादन करतात. ताला सुरांचा व भाषा सौंदर्याचा समंजसपणा हा त्यांना अवगत असतो. किंबहुना तसे शिक्षण प्रशिक्षण घेतलेले कलावंतच ही शास्ञोक्त पध्दत व त्यातील दर्जा टिकवून ठेवण्यासाठी धडपडतात.

 बाल कलावंतांनी सादर केलेली न्रित्य नाटय सुध्दा शास्त्रीय संगीत आणि भाषा वैभवाची साक्ष देणारी होती. शिवाय सरावाने कला कौशल्य कसे विकसित होते याचा तो छान नमुना होता.  मीरा रोड येथील लक्ष्मी नारायण भजनी मंडळाने भजनसंध्या गाजवली. तर महिलांच्या भजनी मंडळाने भजनात सुध्दा शास्त्रीय संगीताचा गोडवा उपस्थित रसिकांना ऐकविला. मुख्य व्यासपीठावर रोज मान सन्मान हे सत्र कायम होते.

शनिमहादेव मंदीर निर्माणात आणि उदघाटन सोहळा आयोजनात ज्या दानशूर व्यक्ती वा संस्थांनी भरीव योगदान दिले आहे अशांचा श्री शनिमहात्मा पूजा समिती कोटे ,नालासोपारा समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. बहुतेक सारे हॉटेल व्यावसायिक असल्याने मोठा खर्च असलेला हा उदघाटन महा सोहळा यशस्वी होण्यासाठी ती मोठी मदत झाली. या सर्वांना योग्य वेळी योग्य साथ मिळाली ती आम. हितेंद्र ठाकूर यांच्या सहकारी नेत्या कार्यकर्ते यांच्या सक्रीय सहभाग घेतला, त्याचाही हा एकत्रित परिणाम झाला आहे.

ययाती कार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ.गिरीष कर्नाड,विख्यात सिने दिग्दर्शक श्याम बेनेगल, शंकर नाग,अनंत नाग, साधू मेहेर ,थोर गायन कलावंत एस.सुब्बालक्ष्मी, यांच्या कला साधनेचा वारसा इथे जपला जात आहे. कन्नड नाटकात आजही शास्त्रीय संगीताचा पगडा पहायला मिळतो. लाऊडता हा एक भाग कायम असतो.

आमदारांचे आगमन आणि देवदर्शन आणि त्यांनी न केलेले भाषण

 या मंदिराच्या या सोहळयात लोकनेते आम. हितेंद्र ठाकूर आपल्या निवडक कार्यकर्ते व मित्रांसह सहभागी झाले. रितीरिवाज व परंपरे प्रमाणे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी देवदर्शन घेतले आणि ते निघाले.आयोजकांनी मुख्य व्यासपीठावर येण्याची विनंती केली. जिथे आधीपासूनच करमणूकीचा कार्यक्रम सुरू होता.आम. हितेंद्र ठाकूर यांनी तो चालू ठेवा एवढच म्हटलं आणि ते निघाले. त्यांचे हे वागणे खूप काही बोलून गेले. एकाच वाक्यात त्यांचे मोठेपण ठळक होते. याला समयसूचकता म्हणावं की राजकीय प्रगल्भता .  ते काहीही असो निमित्त मंदीराच्या उदघाटन सोहळयाचे झाले आणि मनोमिलन महाराष्ट्र व कर्नाटक संस्कृतीचे झाले. चांगला परिचय झाला दाक्षिणात्य उज्वल परंपरा समजल्या. हे सामाजिक ऐक्य समाज हिताचे व विकासाचे ठरावे.

या शनिमंदीराने आपली शानही वाढविली शिवाय एक गरज पूर्ण केली –  महापौर रुपेश जाधव.

नालासोपारा पश्चिमेकडील नव्या शनिमंदिराला व महाकलशोत्सव सोहळयास भेट दिली. माजी उपमहापौर उमेश नाईक यांच्यासह आलेल्या महापौरांनी या वेळी आपले विचार मांडले.

हे महामंदीर माझ्या कार्यकाळात होत आहे हे माझे भाग्य आणि ज्या परिसरात हे होत आहे हे श्री प्रस्थ सुध्दा नशिबवान.

या मंदीराने आपल्या तालुक्याची शान तर वाढविलीच आहे शिवाय तमाम शनिमहादेव भक्त भाविकांची गरजही पूर्ण केली आहे. ज्यांनी ज्यांनी या मंदीर निर्माण कार्यात आपले योगदान दिले आहे त्या सर्वांचे अभिनंदन करणे मी माझे कर्तव्य समजतो.

 माजी उपमहापौर उमेश नाईक यांनी सुध्दा आपल्या भाषणात या उपलब्धी बाबत समाधान व्यक्त केले. दाक्षिणात्य संस्क्रुतीशी आपली जुनी ओळख होतीच आता आपण आणखी जवळ आलो आहोत.

मुंबई वरुन या मंदीराच्या हालचाली सुरू झाल्या. हा प्रयत्न 75वर्षापूर्वी पासूनचा आहे. आज शनिमहादेव इथे विराजमान झाले आणि या महदेवाचे आशिर्वाद सर्वांना लाभावेत व सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत अशा प्रकारच्या शुभेच्छा देत त्यांनी मंदीर सेवा समिती व दानशूर उद्योजकांचे अभिनंदन केले.समितीच्या वतीने अध्यक्ष विरार शंकर शेट्टी यांच्या हस्ते या दोन्ही नेत्यांचा आदर सत्कार करण्यात आला.माजी प्रभाग समिती सभापती राजेश ढगे,नगरसेविका शुभांगी गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला.

विजय शेट्टी व रमाकांत वाघचौडे यांनी छोटेखानी सोहळयाचे सूत्रसंचालन तर प्रविण शेट्टी यांनी आभार प्रदर्शन केले.शनिमंदीराच्या धर्मपीठावर नालासोपारा पश्चिम येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!