युतीकडून आघाडीच्या चिन्हाचा वापर

वसई (वार्ताहर) : शिवसेना-भाजप युतीकडून बहुजन विकास आघाडीच्या चिन्हाचा वापर केला जात असल्यामुळे नेमकी तुमची निशाणी कोणती अशी विचारणा करणारी खिल्ली नागरिकांकडून उडवली जात आहे.

शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा प्रचार करण्यासाठी रिक्षाचा वापर केला जात आहे.रिक्षामध्ये ध्वनीक्षेपक लावून प्रचार करताना रिक्षावर भाजपाचा झेंडाही फडकावण्यात येत आहे.या रिक्षाच्या मागे टेम्पोवर उभे राहून राजेंद्र गावित प्रचार करतानाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत.गावित यांचा प्रचार करताना कमळाचे चिन्ह असलेला झेंडा भाजपाकडून फडकावला जात आहे.हा झेंडा रिक्षेवर लावण्यात आल्यामुळे तुमचे चिन्ह नेमके कोणते अशी खिल्ली नागरिकांकडून उडवली जात आहे.

शिट्टी निशाणी गेल्यानंतर बहुजन विकास आघाडीला रिक्षा हे चिन्ह मिळाले आहे.आणि रिक्षावर कमळाचा झेंडा लावून गावित यांचा प्रचार करण्यात येत असल्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते धनुष्यबाण डावलून कमळाचा आणि रिक्षाचा प्रचार करीत असल्याची चर्चा केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!