युवकांना आंतरिकदृष्टया सबळ करा – आर्चबिशप फेलिक्स मच्याडो

वसई (प्रतिनिधी) : वसईतील युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्याचे स्पृहणीय काम करणाया युवदर्शनया चर्च संलग्न संघटने तर्फे मंगळवार १९ फेब्रुवारी रोजी तरूणाई मधील वाढ ते ड्रग्जचे प्रमाण व आत्महत्यांबाबत योग्य पावले उचलण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.

सदर कार्यक्रमाची सुरूवात ‘तूबुध्दी दे तूतेज दे’ हया भक्तीगीताद्वारे करण्यात आली. कु.रिझल लोपीस आणि सहकारऱ्यांनी सुमधूर आवाजात भक्तीगीत सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच पुलवामा हया ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांत शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना युवदर्शनचे संचालक फा.ऑल्वीन तुस्कानो हयांनी युवकांना भेडसावणाया समस्या आणि हया समस्यांसाठी एकत्रित येऊन कार्य करणे गरजेचे आहे असे विचार मांडले.

कार्यक्रमाचे प्रमुखवक्ते एस. जयाकुमार (I.P.S)  आर्च बिशप फेलिक्स मच्याडो हयांनी भारतदेश तरूण आहे आणि तरूणाई आपले बलस्थान आहे. त्यांचे  जीवन पावलो पावली घडवत राहणे गरजेचे आहे. युवकांना आंतरिक दृष्टया सबळ करणे गरजेचे आहे. युवकांनी आपली वैचारिक पातळी घडवत असताना जीवनात सकारात्मक बदल घडवणे हया बाबत बोधपर मार्गदर्शन आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

वसईभरात तरूणांच्या जीवनात घडणाया विपरित घटनांची माहिती पॉवर पॉईटद्वारे मांडण्यात आली. त्यामध्ये वाहन अपघात ड़्रग्जचे प्रमाण,अीलचित्र पटांकडे आणि दृश्यांकडे वाढत जाणारा कल.  आत्महत्या इत्यांदी बाबत केलेले सर्वेक्षण सूत्र बध्दरित्या मांडण्यात आले. युवकांना जीवनामध्ये सामोरे जाव्यालागणाया विविध आव्हानां बाबत जागृती करण्यात आली. युवकांच्या वाढत्या आत्महत्याही आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब बनलेली आहे. युवक आत्महत्या का करतात हा संशोधनाचा विषय आहे. जगभर यावर अभ्यास सुरूआहे. मान वीमनाची निराशा चिंताही त्यामागची प्रमुख कारण समजली जातात. उदासीनता वैफल्यमानसिक आजार अर्थिक प्रश्न वाढती व्यसनाधीनता इत्यादी त्यातील उपघटक आहेत. वसईत निर्माण होत असलेली धोकाजन्य परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल हयावर श्रोतूवर्गांकडून सूचना मागविण्यात आल्या. शेवटी राष्ट्रगीता द्वारे कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!