राजकारणाने देशाचे वैभव लुटले – मधु चव्हाण

वसई (वार्ताहर) : दासीसुध्दा महाराणी वाटावी असे आपल्या देशाचे वैभव होते.ते राजकारणामुळे लुटले गेल्याची टिका म्हाडाचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रवक्ता मधु चव्हाण यांनी नालासोपारातील  मर्देस गावात केली.

भाजपाचे वसई तालुक्यातील नेते सुरेश जोशी यांच्या 6 व्या स्मृतीदिनानिमीत्त जगमाता मंदिरात राष्ट्रकारण की राजकारण या विषयावर चव्हाण यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे तर प्रमुख अतिथी म्हणून शेखर धुरी उपस्थित होते.स्व.सुरेश जोशी स्मृती मंचाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज पाटील आणि सुत्रसंचालन धनाली जोशी हिने केले.

नेताजी सुभाषचंद्र बोस,राजेंद्र प्रसाद,लालबहादुर शास्त्री,बाबासाहेब आंबेडकर,नेहरु,इंदिरा गांधी या नेत्यांनी राष्ट्रकारण केले.त्यामुळे देश प्रगतीपथावर गेला.आता स्वार्थासाठी मतांसाठी राजकारण केले जात आहे.पदोपदी राजकारण केले जात असल्यामुळे बेकारी, भ्रष्टाचारी,भिकारी, गुन्हेगारीची निर्मीती होत आहे.राजकिय फायद्यासाठी सर्जीकल स्ट्राईक खोटे ठरवून सैन्याचा अपमान केला जात आहे. याकुब मेमनसाठी रात्रीच्या १२ वाजता सुप्रीम कोर्टाला उठवले गेले.देशाच्या प्रश्नावर राजकारण करण्यात येत आहे.राजकारणातील मुल्ये राष्ट्रासाठी वापरली जात नाहीत.अशी खंत वजा टिका मधु चव्हाण यांनी यावेळी केली.

तर सुरेश जोशी यांच्याबद्दल बोलताना काठोळे आणि धुरी यांनी त्यांच्या गुणविशेषाची यावेळी माहिती दिली.ज्या-ज्या ठिकाणी,कार्यक्रमात जोशी जायचे तीथे आपली छाप सोडून जायचे,त्यांनी मंत्री राम नाईक यांच्यासोबत फिरत असतानाही त्यांनी कधी मोठेपणाचा आव आणला नाही.असे काठोळे यांनी सांगितले तर त्यांचे बंडखोर विचाराच्या जोशी यांची स्वप्ने वैभवशाली होती.त्यांनी पक्षासाठी स्वतःच्या प्रकृतीचीही काळजी केली नाही.असे धुरी यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!