राजे परमार “पालघर श्री” चा मानकरी ; योगेश मेहेर दिव्यांगात अव्वल

वसई (वार्ताहर) : पालघर आणि ठाणें जिल्हा बॉडी बिल्डर्स फिटनेस असोसिएशन ,रांगडे जिमनॅशियम, आणि बहुजन विकास आघाडी (युवा आघाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने नालासोपारा पूर्व येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात नुकतीच शरीर सौष्ठव राज्य स्तरीय स्पर्धा झाली. एकूण आठ वजनी गटात झालेल्या या स्पर्धेतील मानाचा असा ‘मॅन फिजिक्स पालघर श्री २०२०’ हा किताब बी फिट च्या राजे परमार याने पटकावला. तर ‘मास्टर पालघर श्री’ किताब भांबले जिमच्या चिराग पाटील याने जिंकला.

दिव्यांग सौष्ठव पटुंच्या गटात टोटल फिटनेसचा योगेश मेहेर हा दिव्यांग पालघर श्री चा मानकरी ठरला. सुधाकर पवार (फिनिक्स जिम)., मीता घुरघूस (भावर जिम)., राहूल म्हात्रे ( रांगडे जिम.)., विनायक जाधव(रॉयल फिटनेस)., हर्षल वैती ( सुनिल जिम)., राजे परमार (बी फिटनेस)., योगेश मेहेर (टोटल फिटनेस)., चिराग पाटील (भांबले जिम ). या शरीरसौष्ठव पटुंनी आपल्या गटातील विजेतेपद पटकावले.अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेला रसिकांची तुफान गर्दी होती. आमदार क्षितीज ठाकूर, युवा आघाडी प्रमुख सिध्दार्थ ठाकूर, प्रभाग समिती सभापती निलेश देशमुख, माजी नगराध्यक्ष राजेश रोडे,युवाचे नालासोपारा अध्यक्ष पंकज देशमुख,माजी नगरसेवक ऍड.रमाकांत वाघचौडे, परेश पाटील, बन्सनारायण मिश्राआदी मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली.

आमदार क्षितीज ठाकूर यांनी स्पर्धा आयोजक आणि स्पर्धकांचे कौतुक केले आणि शुभेच्छाही दिल्या. युवा आघाडीचे पदाधिकारी किशोर काकडे, माजी नगरसेवक किरण काकडे यांनी पुढाकार घेऊन ही स्पर्धा भरविली होती. राजेश रांगडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्टेज मॅनेजमेंट, स्पर्धेचे मूल्यमापन (जजिंग) ही व्यवस्था सांभाळली. स्पर्धेचे सूत्रसंचलन प्रशिक्षक व पदाधिकारी प्रताप पुजारी यांनी केले. डॉ.संजय मोरे यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: