राज्यपालांनी केले वनवासी महिलांचा बांबू हस्तकलेचे कौतुक

वसई : वनवासी महिलांनी बांबुपासून तयार केलेल्या वस्तूंचे कौतुक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे.भालीवली येथील विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून पालघर जिल्हातील दुर्गम भागातील वनवासी/आदिवासी महिलांनी बांबुपासून विविध वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याचे कार्य मागील अनेक वर्षापासून करीत आहेत.

या भगिनींनी तयार केलेल्या वस्तुंची विक्री संस्था स्वतच्या माध्यमातून करते व त्यांना त्यांचा पुर्ण मोबदला रोजगाराच्या स्वरुपात देण्यात येतो. त्यामुळे शेतीपासून दुर्लभ झालेल्या या महिलांना घरबसल्या रोजगार मिळत आहे. या महिलांनी बांबुपासून आकाश कंदील, ट्रे, पेपर वेट, फ्रुट बास्केट, टी-कोस्टर, मोबाईल स्पीकर अश्या अनेक आर्कषक, पर्यावरणपूरक आणि टिकाऊ वस्तूंची निर्मीती केली आहे. या बांबू पासून निर्मित वस्तू मंगळवारी राज्यपालांना दाखवण्यात आल्या. त्यावेळी राज्यपालांनी या महिलांच्या कलेचे आणि वस्तूंचे विशेष कौतुक केले.

अशा उत्तमोत्तम वस्तू नागरिकांनी खरेदी करून या महिलांचा उत्साह वाढवावा. त्यांना प्रोत्साहनासह सन्मानजनक रोजगारही उपलब्ध करून द्यावा.अशी प्रतिक्रिया यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली.यावेळी हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे व विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर चे व्यवस्थापक लुकेश बंड, उपस्थित होते.

बांबूच्या वस्तू बनविण्यासाठी लागणारे साहित्य, प्रशिक्षण, नैसर्गिक रंग हे सर्व संस्थेकडून मोफत उपलब्ध करून देण्यात येते. महिला १८-२० विविध प्रकारच्या पर्यावरण पूरक बांबू वस्तू बनवितात. एवढेच नव्हे तर या बनविलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी संस्थेने रा.महा.क्र ४८ लगत संस्थेच्या परिसरात विक्री केंद्र देखील उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ह्या सर्व वस्तू ऑनलाईन अॅमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहेत.

तसेच ह्या वस्तू खरेदी करिता मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सेंटरच्या भालिवली येथील विवेक राष्ट्र सेवा समितीच्या विक्री केंद्रावर थेट किंवा प्रगती भोईर यांच्या 7798711333 या भ्रमणध्वनीवरून मागणी करता येईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: