राज्यातील वारकरी अयोध्येला जाणार ; ‛राम कृष्ण हरी’चा गजर अयोध्येत घुमणार

मुंबई । जयंत करंजवकर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित २५ नोहेंबरच्या अयोध्या दौ-याला राज्यातील वारकरी या यात्रेत दिंड्या-पताका, भजन-कीर्तन करत सहभागी होणार आहेत. वारकरी प्रबोधन महासमितीचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री हभप रामेश्वर शास्त्री महाराज यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.  श्री. ठाकरे यांनी राम मंदिर उभारण्यासाठी अयोध्येत जाहीर सभा घेण्याचे दसरा मेळाव्यात घोषणा केल्यानंतर उत्तर भारतात संतमहंतांनी शिवसेनेच्या या निर्णयाचे स्वागत केले. तसेच दिल्लीतील धर्मादेश बैठकीत अयोध्या यात्रेला जाहीर पाठींबा दिला होता आणि आता सर्व स्तरातून  शिवसेनेला पाठींबा मिळत आहे.

मुंबईतील डबेवाल्यांचाही पाठिंबा
मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीत अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साडेचार वर्षात त्याबाबत एक अवाक्षरही काढले नसल्याने त्याचा जाब उद्धव ठाकरे २५ नोहेंबरला विचारणार आहेत. या त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत असताना मुंबईतील डबेवाल्यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन शिवसेनेच्या  भूमिकेला पाठींबा दिला आहे.  याप्रसंगी डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुळे, रामदास करवंदे, साबाजी मेदगे, किरण गवांदे, विनोद शेटे, बारकू फापाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!