राम नाईकांचा गणेशपुरीत ‘दीपोत्सवांत’ भव्य सत्कार

वसई (प्रतिनिधी) : गणेशपुरी तीर्थक्षेत्र स्वामी नित्यानंद महाराज मंदिराच्या प्रांगणात, बालयोगी सदानंद महाराज यांच्या उपस्थिती उत्तर प्रदेशाचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या बालयोगी आश्रम संस्थेद्वारे आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास भागवत ज्ञानयज्ञाच्या प्रवक्तया सर्वेश्वरी ताई भिसे, विश्वनाथ वारीगे महाराज, पंढरपूरचे शिवणीकर महाराज, महामंडळाचे अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे ह.भ.प पुरुषोत्तम महाराज, मिरा-भाईंदर महापालिकेच्या सभापती रोहिदास पाटील, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार शांताराम मोरे, आमदार राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आश्रमात सुरू असलेली तोडक कारवाई, सुप्रीम कोर्टात स्वत: अर्जदार बनून राम नाईक यांनी आश्चर्यकारकरित्या थांबवीली! त्यावेळी आश्रम परिसरातच नव्हे तर संपूर्ण वसई-भिवंडी तालुक्यात पोलीस छावण्या तैनात करून आश्रम तोडण्याचे काम सुरू होते व बाल योगी यांचे भक्तगण तसेच व नागरिकांत तीव्र संताप उमटून त्याचे उग्र प्रतिसाद आंदोलनाद्वारे ठिकाणी उमटत होते. आश्रमातील मंदिरावर हातोडा पडला असता तर भयानक स्थिती उद्भवणार होती. अशा स्थितीत तोडक कारवाई थांबून आश्रम मंदिर, वैजनाथ महाराज व पावर्तमाता यांची समाधी तसेच बालयोगी यांच्या निवासाच्या खोल्यांना संरक्षण देण्याच्या आदेश सुप्रीम कोर्ट मिळवण्यात राम नाईक यशस्वी ठरले. सहाजिकच या वर्षीच्या दीपोत्सवात राम नाईक यांच्या आश्रम संस्थेतर्फे होणार सत्कार हा बाबांच्या हजारो भक्तांसाठी कुतूहलाचा, औत्सूकाचा विषय होता.

बाल योगिनी भगवान भगवान रामाचे नाव आपल्या लाडक्या भक्तांच्या मनात कोरून मुखोद्गत केले आहे. असा सदानंद महाराजांचा आश्रम वाचविण्यासाठी पंढरीच्या पांडुरंग भगवानांनी संकटकाळी ‘रामास’ राम नाईक यांच्या रूपात पाठवले असे भावनिक उदगार ज्योती ठाकरे यांनी राम नाईक यांच्या आश्रम तर्फे सत्कार करते प्रसंगी काढताच कार्यक्रमास उपस्थित हजारो भक्तांची ह्रदये आनंदाने उचंबळून आली, मने गहीवरुन गेली.

आपल्या सत्कारास उत्तर देताना राम नाईक आपल्या भाषणात म्हणाले, ”अयोध्या चा राम मंदिराचा अनेक वर्षे अवलंबलेला प्रश्न अखेर दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात सुटला व आता आयोध्येत राममंदिर साकारणार आहे. वाराणसीत यावर्षी राज्यपाल म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली कमिटीच्या माध्यमातून संपन्न झालेली आगळयावेगळया यशस्वी कुंभमेळा सर्वांना आनंद समाधान देऊन गेला व आता बालयोगींच्या आश्रम वाचविण्यात माझ्या प्रयत्नांना आलेले यश या साऱ्या गोष्टी मला वेगळेच समाधान देत आहेत. आश्रम सुरळीत चालावा यासाठी मी यापुढेही सतत प्रयत्नशील राहील,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी सर्वांना दिली. बाबांच्या आश्रमात तयार झालेल्या भक्तांनी या कार्यक्रमात गीतेच्या सोळाव्या अध्यायाचे मुखोद्गत पठण करून दाखवीतच सर्वजण भरावुन गेले. हजारो भक्तांनी मिणमिणत्या पाण्यात उंचावून सामुदायिक दीप पूजा केली. त्यावेळी प्रत्यक्षात भूतलावर उतरल्याचा, आनंदाच्या लहरी भक्तगणांच्या मनात उमटत होत्या. तशी प्रचिती सर्वांनी अनुभवली. आश्रमाचे कार्यक्रम नेहमी यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेणारे पुरुषोत्तम पाटील व आश्रम सेवकांनी खूप मेहनत घेतली. आश्रम संस्थेचे सदस्य भास्कर भोईर व ज्योतीताई ठाकरे यांनी संयुक्तरीत्या सूत्रसंचालन केले तर सचिव गुरुनाथ भोईर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: