राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कृतिकाची निवड

वसई (वार्ताहर) : ४६ व्या राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पीयन स्पर्धेसाठी पालघरची राज्यस्तरीय जलतरणपटु कृतिका वर्तक हिची निवड करण्यात आली आहे.

२६ ते ३० जुन दरम्यान,ज्युनियर ऍक्वाटीक नॅशनल चॅम्पीयन२०१९ ही स्पर्धा संपन्न होणार आहे. त्यातील जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी केळवे पालघरची कन्या कृतिका नंदन वर्तक हिची निवड झाली आहे.गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल स्विमींगपुल राजकोट मध्ये ही स्पर्धा होणार आहे. ५० मि.,१०० मि.फ्रिस्टाईल, ४ बाय १००मि.फ्रिस्टाईल रिले, ४ बाय २०० आणि ४ बाय १०० मि.मेडले रिले या प्रकारात ती भाग घेणार आहे.

कृतिकाने आतापर्यंत जलतरण स्पर्धेत ७ सुवर्ण, ३ रजत आणि २ ब्रांझ पदके पटकावली आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या स्पोर्ट्स फॉर ऑल चॅम्पीयनशीप स्पर्धेत तिला स्कॉलरशीपही मिळाली होती.यावेळी तिला स्टोरीया पुरस्कारासह दहा हजार रुपयांचे पारितोषिकही देण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!