रिक्षाला पर्याय काय ? विरोधक चिंतातुर,पर्यायी वाहनाचा शोध सुरु

वसई (वार्ताहर) : बहुजन विकास आघाडीची शिट्टी ही निशाणी गोठवल्यामुळे खुष झालेले विरोधक आघाडीला रिक्षा हे चिन्ह मिळाल्यामुळे चिंतातुर झाले आहेत.माझे विरोधकच माझा प्रचार करतील असे वक्तव्य करून हितेंद्र ठाकुर यांनी त्यांच्या चिंतेत आणखीनच भर टाकली आहे.

बहुजन विकास आघाडीची सर्वत्र धुमाकुळ घालणारी शिट्टी ही निशाणी शिवसेना-भाजपा युतीने गोठवल्यानंतर ठाकुर विरोधी पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.फक्त 12 दिवसांत ठाकुर त्यांची निशाणी घरोघरी कशी पोहोचवणार हा त्यांचा आनंद क्षणभर टिकला.माझे विरोधकच माझ्या निशाणीचा प्रचार करणार असे वक्तव्य हितेंद्र ठाकुर यांनी केल्यावर विरोधकांना त्यांची चुक लक्षात आली.

प्रचाराचे साहित्य पोहोचवणे,धावता प्रचार करणे,रॅली काढणे,जाहीर सभेसाठी कार्यकर्ते आणि प्रक्षेक  जमवणे,बुथवर साहित्य नेणे,मतदान आणि मतमोजणी करताना कार्यकर्त्यांसाठी नाश्ता-जेवण पाठवणे इतकेच नव्हे तर मतदारांना ने-आण करण्यासाठीही रिक्षाचा वापर करावा लागतो.त्यामुळे ही कामे करताना रिक्षाचा वापर केला तर बहुजन विकास आघाडीच्या चिन्हाचा युतीने वापर केला असा अपप्रचार होऊ शकतो.त्यामुळे या सर्व कामांसाठी पर्यायी वाहन कोणते असावे याची चिंता युतीला लागली आहे.

दुसरीकडे रिक्षा सर्वत्र फिरत असल्यामुळे बहुजन विकास आघाडीला आपले चिन्ह सर्वत्र पोहोचवणे सोपे झाले आहे.तर तालु्यातील सत्ताधारी आघाडीने आपले चिन्ह घेतल्याचे कळल्यामुळे सर्व रिक्षावाले आनंदित झाले आहेत.त्यामुळे रिक्षा या चिन्हाचा फायदा आघाडीला तर फटका युतीला तुर्तास बसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!