‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ मध्ये वसईकर

वसई : डॉ. पॉल डिसोजा सध्या दिल्लीच्या इंडियन सोशल इन्स्टिटयुट मध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहेत. अहमदाबाद येथून सहा वर्षापूर्वी ते दिल्लीला गेले. शहरीकरण आणि विस्थापन हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. भारतातील बारा राज्यातील जातीव्यवस्थेचे गरीबांवर होणारे परिणाम या विषयावर भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे होत असलेल्या अभ्यासाचं ते येथून नेतृत्व करतात. अफगाणीस्तानातील हिंसाचारानंतर तेथील विस्थापीत समुहाबरोबर काम करून त्यांनी त्यांचा अभ्यास प्रसिध्द केलाय.

ह्या आठवडयात त्यांना मलंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये व्याख्यानासाठी निमंत्रित केलं गेलयं. नंदाखाल (विरार प.) येथील संत जोसेफ हायस्कूलच्या मराठी माध्यमातून शिकलेला हा मराठमोळा मुलगा. जर्मनी, चेक रिपब्लिक, इटाली येथील विद्यापीठातून वक्ते म्हणून त्यांना निमंत्रित केलेलं होतं. महाराष्ट्राला संशोधनाची दीर्घ आणि उज्ज्वल परंपरा आहे. तोच वारसा डॉ. डिसोजा पुढे चालवत आहेत. जेज्वीट धर्मगुरू असलेले डॉ्टर पॉल हे ज्ञानवंत व प्रज्ञावंत आहेतच पण त्याहीपेक्षा अतीनम्र व खऱ्या अर्थाने प्रेमळ स्वभावाचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!