लग्नसोहळयात चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर

वसई (वार्ताहर) : चोरीसाठी लग्नसोहळे टार्गेट करण्यात आले असून,त्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात येत असल्याचे भाईंदर पाठोपाठ वसईतील घटनेतून उघड झाले आहे.

वसईतील वसंतनगरीत मिथीलेश सिंग यांच्या मुलीचा शुक्रवारी लग्नसोहळा होता.त्यावेळी स्टेजवरील सोफ्यात त्यांनी आपली पर्स ठेवली होती.या पर्समध्ये १५ वयोगटातील मुलांनी लांबवल्याचे कॅमेरात दिसून आले.अशीच एक घटना काही दिवसांपुर्वी भाईंदरमध्ये घडली होती.लग्नसोहळयाच्या वेळी स्टेजवर ठेवलेली आहेराची बॅग एका अल्पवयीन मुलीने पळवली होती. त्यातही लाखो रुपयांचे दागिने होते.ही घटना एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली होती.या दोन्ही घटनेवरून चोरटयांनी लग्नसोहळे टार्गेट केल्याचे उघड झाले आहे.

लग्न सोहळयाच शेकडो लोकांचा वावर आणि गोंधळ असतो. स्टेजवरी पाहुण्यांची लगबग आणि आहेरांची मोठी पुंजी जमा होत असते.तसेच वरातीच्यावेळी घालण्यासाठी नवरीच्या दागिन्यांची बॅगही तीच्या करवलीजवळ असते. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून चोरटयांनी सोहळा लुटण्याची ही नविन पध्दत सुरु केली आहे.त्यासाठी लहान मुलां-मुलींचा वापर करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: