लायन्स इंटरस्कूल आर्टस ऍंड स्पोर्टस कार्निवल २०१८ ; उद्या पत्रकार परिषद

विरार : यावर्षी प्रथमच लायन्स क्लब आगाशीच्या वतीनेलायन्स इंटरस्कूल आर्टस ऍंड स्पोर्टस कार्निवल २०१८ ” चे आयोजन शुक्रवार दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ ते रविवार दिनांक ०२ नडसेंबर २०१८ या कालावधीत के. जी. हायस्कूल आणि पुरापाडा मैदानआगाशी येथे करण्यात येत आहे.

सदर उपक्रम शालेय निद्यार्थयांकरता असून इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी चे विद्यार्थी सहभागी होतील. या महोत्सवात विविध वैयक्तिक व सांघिककला-क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. आगशीअर्नाळाअर्नाळाकिल्लाचिखलडोंगरे ,बोळींजउमराळेनानभाटसत्पाळानावापुर, राजोडीनाळा,वाघोलीनिर्मळभुईगाव आणि गास आदी निभागातील ३७ शाळांतून ५००० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होत आहेत.

लायन्स क्लब आगाशीच्या ह्या पहिल्या कला-क्रीडा महात्सवाची माहिती देण्याकरिता शनिवार दिनांक २४ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी ११.००. हॉटेल मधुरम‘ ज़ुना जकातनाका,विरार पश्चिम येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!