लायन्स क्लब फंड रेझिंग कमिटी तर्फे क्रिकेट स्पर्धा व सत्कार सोहळा संपन्न

वसई (वार्ताहर) : वसई तालुक्यातील लायन्स क्लबच्या विविध भागातील शाखांनी एकत्र येऊन लायन्स क्लबच्या सामाजिक उपक्रमासाठी लागणारा पैसा गोळा व्हावा या उदात्त हेतूने लायन्स क्लब फंड रेझिंग कमिटी स्थापन करण्यात आली. या कमिटीतर्फे रविवार 12 जानेवारी 2020 रोजी चिमाजी अप्पा मैदान वसई येथे एक दिवसीय ‘लायन 2020 क्रिकेट शिल्ड’ सामान्याचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पनवेल, वाशीसह वसईतील क्रिकेट खेळाडूंनी भाग घेतला. या स्पर्धेसाठी प्रायोजकांकडून प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्विती पारितोषिक ५० हजार रुपये, तृतीय पारितोषिक २५ हजार रुपये ठेवण्यात आले.

संध्याकाळी ६ वाजता गणपतराव वर्तक हॉल येथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ला. प्रशांत पाटील, ला.उदयकुमार विझंनरेकर, ला.श्रध्दा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण ला. अंजली मिस्त्री यांनी केले. क्रिकेट टुर्नामेंटमध्ये प्रथम पारितोषिक ट्राईडेंट इलेवन यांनी पटकावले तर दुसरे पारितोषिक यंगस्टार ट्रस्ट पापडी, वसई तर तृतीय पारितोषिक ओम साईनाथ ग्रुप अर्नाळा यांनी पटकावले. विजेत्या ग्रुपला मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

कला, क्रिडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते सुभाष गोंधळे (कला), दिपक नाईक (शिक्षण), लुझान व लिस्बन फेरारो (सामाजिक), मनाली दक्षिती यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आपल्या सत्काराला उत्तर देताना सुभाष गोंधळे म्हणाले की, ”चित्रकलेचा वारसा पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील मुलांना चित्रकलेची गोडी लागावी या उदात हेतुने मी चित्रकलेचा प्रसार अखंड करत राहणार,” असल्याचे सांगितले. गुरुकृपा निकेतनचे संस्थापक दिपक नाईक हे या सत्काराने भारावून गेले. स्व.परुळेकर यांच्या मार्गदर्शनाने तसेच माझ्या क्लासच्या आजी व माजी शिक्षकांच्या सहकार्याने मी शिक्षण क्षेत्रात 50 वर्षे अविरत कार्य करु शकलो. त्याबद्दल त्यांचा सदैव ऋ णी राहिल, अशा भावना व्यक्त केल्या.

आंतरराष्ट्रीय क्रिक्रेट स्पर्धेत वसईचे नाव चमकरणारी प्रथम महिला क्रिकेटपट्टू मनाली दक्षिणी हिने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ”या संपूर्ण उज्वल यशाचे श्रेय माझे वडील आणि आई यांना आहे. भुईगांव येथील समुद्रकिनाऱ्यांवर असंख्य पर्यटक येतात व समुद्र किनारा अस्वच्छ करतात. समुद्रकिनाऱ्यावर असंख्य पर्यटक येतात व समुद्र किनारा अस्वच्छ करतात. समुद्र किनाऱ्यावर ही दुरावस्ता ‘फेरारो’ या दांपत्यास बघवली नाही. त्यांनी हा समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्याचे व्रत घेतले व लाखो टन कचरा काढून परिसर कायम स्वच्छ ठेवण्याचे कार्य या दांपत्याने व त्यांच्या लहान मुलांनी केले. त्याच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन लायन्स क्लब ऑॅफ वसई यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.” सत्काराला उत्तर देताना फेरारो म्हणाले की, ”आम्ही सन 2017 पासून हे कार्य करत आहोत. आम्हाला दिवसेंदिवस उत्तम प्रतिसाद मिळत आहे.”

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ला.प्रशांत पाटील म्हणाले की, ”लायन्स क्लबच्या कार्यात ‘जिथे कमी तिथे आम्ही’ असतोच. समाजाच्या कार्यासाठी आम्ही जनतेच्या विश्वासावर आम्ही फंड जमा करतो.” या कार्यक्रमात उदय कुमार विंझानकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ला.श्रध्दा मोरे व त्यांचे सहकारी यांनी केलेल्या अभूतपूर्व कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचलन ला.राजेश मोदगेकर यांनी केले व उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब ऑॅफ वसईच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. लायन्स क्लब फंड रेझिंग कमिटी तर्फे क्रिकेट स्पर्धा व सत्कार सोहळा संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: