‛लालबागचा राजा’ तर्फे ‛आयएएस’, ‛आयपीएस’  परीक्षेचे मोफत प्रशिक्षण शिबीर

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील पदवीधरांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचे मार्गदर्शन मिळण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे १३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत लालबागच्या हनुमान मंगल कार्यालय, चिवडा गल्ली येथे आयएएस, आयपीएस विनामूल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
      पुणे येथील युनिक अकादमीचे संचालक आणि   यूपीएससी परीक्षेचे मार्गदर्शक प्रा. मनोहर भोळे ‘यूपीएससी परीक्षेची संपूर्ण तयारी आणि यशाचा गुरुमंत्र’, विदर्भातील जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ  ‘प्रशासकीय सेवेचे शिवधनुष्य पेलताना’ आणि  २१ व्या वर्षी अथक परिश्रमाने आयएएस झालेले अन्सार शेख  ‘आयएएस २१ व्या वर्षी’ यावर मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांनी  गुरुवार १० जानेवारी पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत नाव नोंदणी  लालबागचा राजा प्रबोधिनी, पेरू कंपाउंड चाळ, लालबाग येथे प्रत्यक्ष येऊन नोंदवावीत. अधिक माहितीसाठी संपर्क : २४७१५९५९/२४७१५९५८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!