‛लिव्ह इन रिलेशनशिप’ मधून जन्मला आलेल्या बाळाला पोटगी मिळेल

वसई (प्रतिनिधी) : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील तरुणीला झालेल्या बाळाला पोटगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वसई कोर्टाने दिला आहे. शारीरिक संबंध असलेल्या जोडप्याला पती-पत्नी मानण्यात यावे, असा निकाल मद्रास हायकोर्टाने दिला आहे. त्यानंतर हा एक महत्वपूर्ण निर्णय आला आहे.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील तरुणीला झालेल्या बाळाला पोटगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वसई कोर्टाने दिला आहे. ‘कायद्यानुसार रीतसर लग्न झालेल्या जोडीदाराकडे पोटगी मागण्याची तरतूद आहे. त्यासाठी कोर्टात दाद मागता येते. मात्र, लग्न न करता पती-पत्नीसारखे राहत असलेल्या जोडप्याला झालेल्या बाळाला हा कायदा लागू आहे,’ असे स्पष्ट करीत पोटगीचा अधिकार बहाल करण्यात आला आहे.

एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या तरुणासमवेत उभयतांच्या घरातील ज्येष्ठांच्या संमतीने ही तरुणी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू लागली होती.
त्याने लग्नाचे आश्वासनही दिले नंतर त्याना एक मुलगा झाला जेव्हा तरुणीने लग्नाचा तगादा लावला तेव्हा तरुण मात्र, ते पूर्ण न करता तो संबंधित तरुणीला त्रास देऊ लागला होता. अखेर ती कंटाळून माहेरी परतली आणि पोटगीसाठी दावा दाखल केला. त्यावरील सुनावणीदरम्यान न्या. एस. बी. पवार यांनी हा अंतरिम निर्णय दिला. केसची सुनावणी सुरू असेपर्यंत दरमहा पाच हजार रुपयांची पोटगी तिला देण्यात यावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
शारीरिक संबंध असलेल्या जोडप्याला पती-पत्नी मानण्यात यावे, असा निकाल मद्रास हायकोर्टाने दिला आहे. त्यानंतर ‘लिव्ह इन’मधील जोडीदारांनाही विवाहित जोडप्याप्रमाणे अधिकार दिले जावेत त्याना झालेल्या बाळाला पोटगीचा अधिकार आहे अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर पोटगीचा अधिकाराचा निर्णय महत्वाचा ठरत आहे.

तरुणाने हिदु विवाह पदध्तिनुसार विवाह न करता या तरुणीसह ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा निर्णय त्याने घेतला. अनेक वर्षे ते दोघे घर घेऊन एकत्र राहत होते. मात्र, काही दिवसांनंतर त्यांचे पटेना. त्यानंतर या तरुणीने अॅड. यज्ञेश कदम यांच्यामार्फत कोर्टात अर्ज दाखल केला.अॅड. यज्ञेश कदम यानी पीडित मुलीतर्फे युक्तिवाद करत अनेक गंभीर मुद्यावर न्यायालयाचे लक्ष वेधले

सुनावणीदरम्यान समन्स बजाविल्यानंतरही तो तरूण न्यायालयात हजर झाला नाही. त्यानंतर, तरुणीने त्यांना राहण्यासाठी दिलेल्या वस्तू त्याने परत द्याव्यात. तसेच दरमहा पाच हजार रुपयांची पोटगी मिळावी, अशी मागणी तरुणीने केली होती. ती मान्य करीत न्यायालयाने पोटगी देण्याचा आदेश बजावला

हा विजय केवळ या एका तरुणीचा नसून त्या सर्व महिलांचा आहे ज्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेचा बळी पडल्या आहेत लिव्ह इन रिलेशनशिप’मधील तरुणीला झालेल्या बाळाला पोटगी देण्याचा ‘घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा-२००५’अंतर्गत पोटगी किंवा अन्य कोणतेही लाभ दिले जाऊ शकतात या कायद्याचा लाभ मिळण्यासाठी कलम २ (एफ) मधील व्याख्येनुसार घरगुती नाते असणे आवश्यक आहे. यात अन्य मार्गांसह विवाह किंवा विवाह स्वरूपाच्या संबंधातून दोन व्यक्तींनी एकाच घरात राहण्यालाही घरगुती नाते समजण्यात आले आहे. अविवाहित महिलेला ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहिल्यानंतर घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत लाभ मिळू शकतात. यासाठी तिला लग्न करण्याची गरज नाही. परंतु ती महिला व संबंधित पुरुष कायद्यानुसार लग्न करण्यास पात्र पाहिजेत. ते लग्नाच्या वयाचे असायला हवेत. समाज पती-पत्नी म्हणून ग्राह्य धरतील अशाप्रकारे त्यांनी सोबत राहायला पाहिजे – अॅड. यज्ञेश कदम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!